शहरं
Join us  
Trending Stories
1
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
2
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
3
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
4
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
6
"झालमुडी मी खाल्ली अन् मिरची... ४ मे रोजी मिठाई वाटणार!"; पश्चिम बंगालमध्ये मोदींचा मोठा दावा, ममतांवर निशाणा
7
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
8
स्कोडाची ८-स्पीड गिअर बॉक्सवाली कुशाक...! तोच घाट, मायलेजवर काय फरक पडला? धक्का दिला की...
9
Video: सशस्त्र जवान, मॉस्किटो फ्लीट; 'होर्मुझ'मध्ये थरार, भारताचे जहाज इराणच्या लष्कराने कसे घेतले ताब्यात, पहा व्हिडीओ 
10
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
11
"ज्या राज्याचे उपमुख्यमंत्री विमान अपघातात जातात, त्याचा..."; सुप्रिया सुळेंचे सूचक विधान
12
Ganga Saptami 2026: पितरांना सद्गती मिळावी म्हणून आजच्या तिथीला आठवणीने म्हणा 'हा' श्लोक!
13
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
14
अमराठी वाहनचालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी साहित्यिकांचा पुढाकार- मंत्री प्रताप सरनाईक
15
Gen Z कडून 'जशास तसं' उत्तर; कामाच्या ठिकाणी 'सिनियर्स'वर विश्वासच नाही, वाटतात अकार्यक्षम
16
पत्नीचे फिट राहणे पतीला आवडले नाही; जिमला जाण्यावरून झाला वाद, चिडलेल्या नवऱ्याने बायकोला संपवले अन्.. 
17
लग्नाच्या १३ वर्षांनी मोडणार टीव्ही अभिनेत्रीचा संसार? पदरात १० वर्षांचा मुलगा, म्हणाली- "मला ड्रामा नकोय..."
18
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
19
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
20
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
Daily Top 2Weekly Top 5

मौखिक आरोग्यासाठी चळवळ

By admin | Updated: January 6, 2017 20:07 IST

शहराच्या स्वच्छतेसोबत शारीरिक स्वच्छता महत्त्वाची असते. यासाठी शासनाने स्वच्छ भारत अभियानानंतर शारीरिक स्वच्छतेसाठी स्वच्छ मुख अभियान २३ जानेवारी पासून राबविण्याचा निर्णय घेतला आहे.

ऑनलाइन लोकमत
हर्षनंदन वाघ /ऑनलाइन लोकमत
बुलडाणा, दि. 6 - शहराच्या स्वच्छतेसोबत शारीरिक स्वच्छता महत्त्वाची असते. यासाठी शासनाने स्वच्छ भारत अभियानानंतर शारीरिक स्वच्छतेसाठी स्वच्छ मुख अभियान २३ जानेवारी पासून राबविण्याचा निर्णय घेतला आहे. सदर अभियान पुढील तिन
महिने सुरू राहणार असून यांची जबाबदारी वैद्यकीय शिक्षण व आरोग्य विभागावर सोपविण्यात आली आहे. या अभियानात बुलडाणा जिल्ह्यातील २ हजार ३३२ शाळा सहभागी होणार आहेत.
पंतप्रधानांच्या संकल्पनेतून देशात स्वच्छ भारत अभियान राबविण्यात आले. या अभियानास सर्वस्तरातून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला असून,  स्वच्छतेमुळे अनेक ठिकाणी आजाराचे प्रमाण कमी झाले.  या अभियानाप्रमाणे शरीरिक स्वच्छता ठेवण्यास अनेक आजार उध्दभवणार नाहीत म्हणून शासनाने प्रत्येक शाळेत स्वच्छ मुख अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे. अनेक
व्यक्ती शारीरिक स्वच्छतेकडे गांभीर्याने पाहत नाहीत. धुम्रपान, तंबखूजन्य पदार्थ, गुटखा, अंमली पदार्थ, जंकफुडचे सेवन करतात. त्यामुळे मुखाचे विविध आजार निर्माण होतात. दिवसेंन्दिवस अशा आजारात मोठ्या प्रमाणात वाढत होत आहे. त्यामुळे मौखिक आजारासंदर्भात नागरिकांमध्ये जनजागृती होण्यासाठी वैद्यकीय शिक्षण व अरोग्य विभागाच्यावतीने राज्यस्तरावर स्वच्छ मुख अभियान-२०१७ सुरू करण्यात येणार असून त्याचे उद्घाटन २३ जानेवारी रोजी राज्यपालांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर सदर
अभियान राज्यातील प्रत्येक शाळेत राबविण्यात येणार आहे. त्यात बुलडाणा जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या १ हजार ४४८, नगरपालिकेच्या १०७ व खाजगी संस्थेच्या ७७७ अशा एकूण २ हजार ३३२ शाळांचा समावेश आहे.
विद्यार्थ्यांची दंत तपासणी व चर्चासत्राचे आयोजन
स्वच्छ मुख अभियान वैद्यकीय शिक्षण व आरोग्य विभागाच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणार आहे. याबाबतच्या प्रस्तावास शासनाने १५ डिसेंबर २०१६ रोजी मान्यता देवून २३ जानेवारी २०१७ पासून राबविण्याचा निर्णय घेतला आहे. सदर अभियान वैद्यकीय शिक्षण व आरोग्य विभाग राबविणार असल्यामुळे या विभागाच्या पथकाकडून  प्रत्येक विद्यार्थ्यांची दंत तपासणी तसेच समाजात मुख स्वच्छतेबाबत चर्चासत्राचे आयोजन करण्यात येणार आहे. या अभियानाची संपूर्ण जबाबदारी शासकीय दंत महिविद्यालयाच्या अधिष्ठातांवर राहणार असून शासकीय दंत रूग्णालयाच्यावतीन पुढील तीन महिने टप्प्याटप्प्याने दंत तपासणी शिबिरे आयोजित करून त्याचा अहवाल राज्यस्तरीय समितीला सादर करावा लागणार आहे.