शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: केंद्रीय कायदामंत्र्यांनी लोकसभेत सादर केले सीमांकन विधेयक; संसदेत गदारोळ
3
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
4
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
5
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
6
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
7
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
8
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
9
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
10
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
11
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
12
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
13
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
14
१७३ वर्षांपूर्वी प्रथम धावली, ४०० जणांचा प्रवास; आजही सेवेत, भारतीय रेल्वेची ‘ती’ ट्रेन कोणती?
15
विराट कोहली सामना संपल्यावर स्वत:हून LSGचे मालक संजीव गोयंकांना भेटायला गेला, फोटो VIRAL
16
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
17
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
18
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
19
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
20
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
Daily Top 2Weekly Top 5

लांजूड लघू प्रकल्पातून २०० पेक्षा जास्त ब्रास गौण खनिजाची चोरी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2019 13:54 IST

तहसीलदारांनी जान्दू कंन्स्ट्रक्शन कंपनीला २० लक्ष ८० हजाराचा दंड ठोठावला.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: खामगाव तालुक्यातील लांजूड येथील लघू प्रकल्पाच्या सांडव्यातील गौण खनिज चोरी प्रकरणी पंचनाम्यास विलंब झाल्याने शासनाचा मोठ्याप्रमाणात महसुल बुडाल्याचे समोर येत आहे. सांडव्यातील अवैध गौण खनिज चोरी प्रकरणी तहसीलदारांनी जान्दू कंन्स्ट्रक्शन कंपनीला २० लक्ष ८० हजाराचा दंड ठोठावला. मात्र, घटनेनंतर वेळीच महसूल प्रशासनाकडून पंचनामा करण्यात आला असता तर दंडाची रक्कम कितीतरी पटीने वाढल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.खामगाव तालुक्यातील लांजूड शिवारातील शेतसर्वे क्रमांक १५४ अ आणि १४८ ला लागून असलेल्या परिसरातून ४ ते ७ जुलै दरम्यान रात्रीच्या अंधारात हजारो गौण खनिजाची चोरी करण्यात आली. यासंदर्भात ५ जुलै रोजी जिल्हाधिकारी बुलडाणा यांच्याकडे तक्रार करण्यात आली. या तक्रारीत गौण खनिज चोरीसाठी ३ पोकलेन आणि १५ टिप्परचा वापर करण्यात आल्याचे नमूद करण्यात आले. तसेच ४ जुलैच्या रात्री १० वाजतापासून ५ जुलैच्या पहाटेपर्यंत मोठ्याप्रमाणात गौणखनिजाची चोरी करण्यात आल्याचे नमूद करण्यात आले. त्याचप्रमाणे स्थानिक महसूल प्रशासनालाही याची जाणिव करून देण्यात आली. मात्र, प्रत्यक्षात तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांनी पंचनाम्यास विलंब केला. त्यानंतर अपुरा पंचनामा करण्यात आल्याचेही सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण सनानसे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केलेल्या तक्रारीत नमूद केले आहे.बोरजवळा गौण खनिज चोरी प्रकरणी तपास थंडबस्त्यात!खामगाव तालुक्यातील बोरजवळा येथील तलावातून जुलै महिन्यात मोठ्याप्रमाणात गौण खनिजाची चोरी करण्यात आली होती. याप्रकरणी बोरजवळा येथील तलाठी यांनी पंचनामा अहवाल महसूल प्रशासनाकडे सादर केला. त्यानंतर तहसीलदारांनी या तलावातील गौण खनिज चोरीप्रकरणी तपासणी करण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र, बोरजवळा येथील गौण खनिज चोरी प्रकरणी अद्यापही तपास थंडबस्त्यात असल्याचे दिसून येते.

लांजूड प्रकल्पातून चोरीसाठी ३ पोकलेन आणि १५ पेक्षा जास्त टिप्परचा वापर करण्यात आला. त्यामुळे पंचनाम्यापेक्षा कितीतरी पटीने या तलावातून गौण खनिजाची चोरी झाली. मात्र, महसूल प्रशासनाने पंचनामा विलंबाने केल्याने कंत्राटदाराचा लाभ असून, शासनाचा महसूल बुडाला. याबाबत जिल्हाधिकाºयांकडे तक्रार केली आहे.- लक्ष्मण सनानसेसामाजिक कार्यकर्ता, पारखेड ता. खामगाव.

 

टॅग्स :khamgaonखामगावsandवाळू