विवेकानंद आश्रम उभारणार शुकदास महाराजांचे स्मारक!

By Admin | Updated: April 24, 2017 00:21 IST2017-04-24T00:21:34+5:302017-04-24T00:21:34+5:30

हिवराआश्रम: विवेकानंद वाटिकेच्या आराखड्यात किरकोळ बदल केले जाणार आहेत. तर लवकरच विवेकानंद स्मारकाप्रमाणे भव्य शुकदास महाराजांचे स्मारकाची निर्मिती केली जाणार आहे.

Monument to Shukadas Maharaj to build Vivekananda Ashram! | विवेकानंद आश्रम उभारणार शुकदास महाराजांचे स्मारक!

विवेकानंद आश्रम उभारणार शुकदास महाराजांचे स्मारक!

हिवराआश्रम: शुकदास महाराजांचे भव्यदिव्य स्मारक असावे, अशी सर्वधर्मीय समाजाने केलेली विनंती विवेकानंद आश्रमाच्या विश्वस्त मंडळाने गांभीर्याने घेतली असून, महाराजांच्या भव्यदिव्य स्मारकाच्या निर्मितीसाठी विश्वस्त मंडळांनी पुढाकार घेतला आहे.
प्रारंभी समाधीभोवती छोटेखानी स्मारकनिर्मिती केली जाणार असून, त्यासाठी विवेकानंद वाटिकेच्या आराखड्यात किरकोळ बदल केले जाणार आहेत. तर लवकरच विवेकानंद स्मारकाप्रमाणे भव्य स्मारकाची निर्मिती केली जाणार आहे. महाराजांचे कार्य हे सर्व धर्मातीत होते. त्यांनी सर्वधर्मीयांना रोगमुक्त केले, कल्याणकारी विचार दिले व सेवाकार्याद्वारे त्यांच्या जीवनात आनंद निर्माण केला. महाराजांच्या स्मारकस्थळी सर्वांना पोहोचता यावे, तेथे त्यांना शांतता व महाराजांच्या सानिध्याचा लाभ व्हावा, यासाठी स्मारकाची रचना सर्वांना चालेल, अशा रीतीने ठेवण्यासाठी विश्वस्त मंडळ आरेखन करत आहे.
हिवराआश्रम येथील विवेकानंद ग्रामीण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय हे शुकदास महाराजांचे स्वप्न होते. एकदा ग्रामीण रुग्णालय झाले अन् तेथे गोरगरिबांना चांगल्या प्रकारची वैद्यकीय सेवा मिळू लागली की, माझ्या कार्याचे साफल्य झाले, असे महाराज नेहमीच सांगत असत. त्यानुशंगाने ग्रामीण रुग्णालयाचे काम वेगाने सुरू असून, वैद्यकीय महाविद्यालयासाठी विवेकानंद आश्रमाच्या विश्वस्त मंडळातर्फे प्रयत्न केले जाणार आहेत.
महाराजांचे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी विश्वस्त मंडळ जोमाने कामाला लागले आहे. कोराडी जलाशयातील जागतिक दर्जाचे विवेकानंद स्मारकाचे कामही वेगाने पूर्णत्वाकडे नेल्या जात आहे. 

Web Title: Monument to Shukadas Maharaj to build Vivekananda Ashram!