शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
2
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
3
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
6
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
7
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
8
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
9
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
10
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
11
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
12
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
13
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
14
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
15
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
16
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
17
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
18
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
19
राेज ६ मिनिटं वाचन केलं तर मानसिक तणाव होतो कमी, वाचनाची सुटलेली सवय लावायची सोपी युक्ती
20
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

एक महिन्यात २२८ अंध ठरले अपात्र

By admin | Updated: October 15, 2015 00:27 IST

जागतिक अंध साहाय्यता दिन; अंधाना सुविधा पुरविण्याची गरज.

बुलडाणा : अंधत्वाचं जिणं जगणार्‍यांना समाजाच्या सहानुभूतीपेक्षाही हक्काचं विश्‍व हवं असतं. त्यांचे हक्क, अधिकार आणि सेवा-सुविधा याबाबत शासनस्तरावर होणार्‍या या निर्णयांची मात्र प्रत्यक्ष अंमलबजावणी होत नाही. बरेचदा प्रशासनातर्फे अंध व्यक्तींना सापत्न वागणूक मिळते. गत एक महिन्यात ५५८ अंध अर्जदारांपैकी २२८ अंधांना अपात्र ठरविण्यात आले आहे. जिल्ह्यात गत पाच वर्षात नोंदविण्यात आलेली अपंगाची संख्या १ लाख १८ हजार ७२३ आहे. यात १८ हजार ९६५ अंध नागरिकांचा समावेश आहे. अंध नागरिकांना आधार देण्यासाठी शासनाकडून विविध योजना राबविल्या जातात; मात्र आरोग्य विभागाच्या विविध कसोट्यांवर खरे न उतरल्यामुळे बर्‍याच अंध नागरिकांना विविध लाभांपासून वंचित ठेवले जाते. जिल्ह्यात अपंगत्व आणि दृष्टिदोषांचे खोटे प्रमाणपत्र सादर करून शासकीय सवलती लाटणार्‍यांची व नोकरी मिळविणार्‍यांची संख्या मोठी आहे; मात्र खर्‍या अंधांना अद्याही प्रशासनाकडून सापत्न वागणूक दिली जात आहे. जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरात अपंग पुनर्वसन केंद्र चालविले जाते. प्रत्येक महिन्याच्या दुसर्‍या आणि तिसर्‍या बुधवारी अपंग बोर्डच्यावतीने तपासणी करून अंध व दृदिोष असल्याचे प्रमाणपत्र देण्यात येते. गत एक महिन्यात जिल्ह्यातील ५५८ दृष्टिदोष व अंधत्व असलेल्या नागरिकांनी केंद्रांकडे अर्ज केले होते. विविध नियमांच्या कसोट्यांवर पारख करून ३३0 नागरिकांना अंधत्वाचे प्रमाणपत्र देण्यात आले, तर निकषात न बसलेल्या २२८ नगरिकांचा अर्ज अपात्र ठरविण्यात आले. त्यामुळे अपात्र, अंधांवर शासकीय योजनापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे.

शासकीय कार्यालयांत अंधाची अवहेलना

        शासकीय कार्यालये, रेल्वे स्टेशन, एस.टी. स्टँड परिसरात अपंग व अंधांसाठी व्हीलचेअर ठेवण्याचे बंधन असताना जिल्ह्यातील अशा अनेक शासकीय कार्यालयांतून व्हीलचेअरच गायब आहेत. त्यामुळे अंध व्यक्तींना सुविधा पुरविण्याचा शासनाचा आदेश कागदावरच आहे. त्यामुळे बर्‍याच शासकीय व प्रशाकीय इमारतींमध्ये अंधांशी दुजाभाव होत आहे.