शहरं
Join us  
Trending Stories
1
आईच्या नावाने मुलाला ओळखणार, कागदपत्रांवर मातेचे नाव लागणार! सर्व शाळांमध्ये एकच नियम लागू
2
Watermelon Death Case Mumbai : कलिंगडामुळे मृत्यू नाही! FDA अहवालाने संभ्रम मिटला; मुंबईतील 'त्या' ४ जणांच्या मृत्यूचे गूढ कायम
3
बरगी धरणात देवदूत धावले! स्वतःचा जीव धोक्यात घालून कामगारांनी वाचवले डझनभर प्राण; मुख्यमंत्र्यांनी बक्षीस केले जाहीर
4
IPL 2026 Playoffs Race: पुढचं पुढं बघू, आधी CSK चा बदला घेऊ! याच इराद्याने चेपॉकच्या मैदानात उतरेल MI
5
Post Office Scheme : सोन्यासारखी आहे पोस्ट ऑफिसची 'ही' स्कीम; ₹१ लाख जमा करा, मिळेल ₹४५,००० चं व्याज
6
युद्धामुळे तेलाच्या दराचा भडका! सर्वाधिक फटका भारताला, पेट्रोल-डिझेलच्या किमतींचा ‘टाइम बॉम्ब’
7
‘त्या’ मृतांपैकी एकाच्या अवयवाचा रंग हिरवट; खरे कारण अहवाल आल्यानंतर कळणार?
8
बोट बुडू लागली तेव्हा आतमध्ये काय घडलं? लाईफ जॅकेट कुठे होते? दुर्घटनेच्या व्हिडीओत दिसलं असं काही
9
साडेतीन वर्षांच्या बालिकेचा लैंगिक अत्याचार करून खून; नराधमास ताब्यात द्या, ग्रामस्थ संतप्त, महामार्ग दोन तास रोखला
10
कमर्शियल LPG दरवाढीचा हॉटेल उद्योगाला जोरदार फटका; खाद्यपदार्थांचे दर १५ टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता
11
भारतीय उद्योगांना चीनचा विळखा; इलेक्ट्रॉनिक, रसायने, औषध क्षेत्र संकटात येण्याची भीती
12
"इराणला अण्वस्त्रे देऊ नका, ते क्षणातच विध्वंस घडवतील", ट्रम्प यांनी 'नाटो'ला केलं सावध!
13
ईव्हीएममध्ये फेरफार केल्याच्या आरोप; बंगालमधील १५ मतदान केंद्रांवर फेरमतदान सुरू
14
आजचे राशीभविष्य - २ मे २०२६, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील, कुटुंबात सुख-शांती नांदेल
15
ट्रम्प चिडले, पण फेमस झाल्या जॉर्जिया मेलोनी! तरुणाई तर त्यांच्यामागे खंबीरपणे उभी राहिली
16
मुंबईत ‘ऑपरेशन व्हाइट स्ट्राइक’, १,७४५ कोटींचे अमली पदार्थ जप्त; ३४९ किलो कोकेनही हस्तगत
17
IPL 2026 : वैभव-यशस्वी सुपरहिट जोडीचा फ्लॉप शो! तरी RR निर्धास्त; KL राहुलच्या खेळीने DC ला दिलासा
18
महामुंबईत सायकल ट्रॅकचा ‘ट्रॅक’च हरवला!, सायकल आहे, पण चालवायची कुठे?; कोट्यवधींचा खर्च वाया
19
पेट्रोल-डिझेल दरवाढ उंबरठ्यावर?; व्यावसायिक गॅस सिलिंडरही महागले, निवडणुका आटोपताच तगडा झटका
Daily Top 2Weekly Top 5

आमदार आकाश फुंडकर यांनी केली गारपिटग्रस्त भागाची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2020 17:18 IST

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची मागणी त्यांनी केली आहे.

खामगाव: अवकाळी पाऊस, गारपिटग्रस्त भागाची खामगाव मतदारसंघाचे आमदार आकाश फुंडकर यांनी पाहणी केली. जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची मागणी त्यांनी केली आहे. खामगांवसह संपुर्ण जिल्हयाभरातील नांदुरा, शेगांव,जळगांव जामोद, मोताळा, मेहकर, चिखली,संग्रामपूर,बुलढाणा, मलकापूर, लोणार, सिंदखेडराजा, देऊळगांव राजा या सर्व तालुक्यात अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे मोठे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली. आज भाजपा जिल्हाध्यक्ष तथा आमदार ॲड आकाश फुंडकर यांनी खामगांव तालुक्यातील गारपिट, अवकाळी पाऊस व वादळी वा-यामुळे नुकसान झालेल्या गावांचा दौरा केला.       आज खामगांव तालुक्यातील तांदुळवाडी, निपाणा, उमरा भंडारी, कुंबेफळ, भालेगांव, ढोरपगांव काळेगांव हया गावांच्या नुकसानग्रस्त भागाचा दौरा केला हयावेळी दौ-यात उपविभागीय अधिकारी श्री चव्हाण, तहसिलदार रसाळ, गोपाल गव्हाळ, पुंडलीक बोंबटकार, लाला महाले, तालुकाध्यक्ष सुरेश गव्हाळ, युवराज मोरे, शांताराम बोधे, राजेश तेलंग, समाधान मुंडे हे सोबत होते. जिल्हाध्यक्ष ॲड आकाश फुंडकर यांनी मा.जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांच्याशी फोनव्दारे चर्चा केली.  हयावेळी त्यांनी जिल्हाधिकारी यांना शेतक-यांची व्यथा मांडली, ते म्हणाले की, हयागांवामध्ये आसमानी संकटामुळे गहु,मका,हरबरा,काद्यांच्या,टरबूज,कापूस पिकाचे मोठे नुकसान झाले आहे.  शेतक-यांच्या हाताशी आलेला घास हिरावला गेला आहे.  यासोबतच काही तालुक्यामध्ये केळी व इतर फळबागांचे मोठया प्रमाणात नुकसान झाल्याचे समजते.  या महिन्यात सतत तिस-यांदा अवकाळी पावसामुळे व वादळी वा-यामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. सोंगून ठेवलेला हरबरा, गहू मातीत मिळाला आहे. रब्बीचे पिक मातीमोल झाले आहेत. हया सोबतच अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली आहे. त्यामुळे हया सर्व नुकसानीचे पंचनामे होणे आवश्यक आहे. हयाबाबत आपण तातडीने आदेश द्यावे असे त्यांनी मा. जिल्हयाधिकारी यांना सांगितले.  हयावर मा. जिल्हाधिकारी यांनी लगेच पंचनामे करण्याबाबत संबंधीतांना आदेश दिले असल्याचे सांगितले.       जिल्हयातील हया आपदाग्रस्तांना राज्य शासनाने तातडीने दयावी अशी मागणी  भाजपा जिल्हाध्यक्ष आमदार आकाश फुंडकर यांनी केली आहे. ज्यांच्या घरांची पडझड झाली आहे.  अशांना शासनातर्फे तातडीने मदत देण्यासाठी त्यांचे पंचनामे करुन अहवाल सादर करण्याबाबत संबंधीतांना आदेश द्यावे असे ही ते म्हणाले.        तरी सुंपर्ण जिल्हयात झालेल्या अवकाळी पाऊस, वादळ वारा व गारपिटीचे तात्काळ पंचनामे करुन व शेतक-यांना मदत देण्यात यावी अशी मागणी भाजपा जिल्हाध्यक्ष यांनी आज केली.

टॅग्स :khamgaonखामगावFarmerशेतकरी