अल्पवयीन मुलीशी कुकर्म

By Admin | Updated: January 29, 2015 23:34 IST2015-01-29T23:34:24+5:302015-01-29T23:34:24+5:30

बाळापूर तालुक्यातील घटना; नराधम पित्यास अटक.

Mischief to a minor girl | अल्पवयीन मुलीशी कुकर्म

अल्पवयीन मुलीशी कुकर्म

अकोला : स्वत:च्या अल्पवयीन मुलीचे दोन वर्षांपासून लैंगिक शोषण करणार्‍या बाळापूर तालुक्यातील कोळासा येथील नराधम पित्यास बाळापूर पोलिसांनी गुरुवार, २९ जानेवारी रोजी अटक केली. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कोळासा येथील हा नराधम बाप त्याच्या १६ वर्षीय मुलीवर दोन वर्षांपासून लैंगिक अत्याचार करीत होता. याबाबत कुठे वाच्यता केल्यास जिवे मारण्याची धमकीही तो मुलीस देत होता. त्यामुळे भेदरलेल्या मुलीने आजपर्यंंत हा प्रकार कुणालाही सांगितला नाही. अखेर या अत्याचाराला कंटाळून मुलीने गुरुवारी बाळापूर पोलीस ठाणे गाठले व अत्याचाराला वाचा फोडली. पीडित मुलीच्या फिर्यादीवरून पोलिसांनी नराधम बापाविरुद्ध भादंविच्या कलम ३७६, ५0६ व लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण कायदा (पास्को) च्या कलमान्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.

Web Title: Mischief to a minor girl