मिनी ट्रकची बसला धडक

By Admin | Updated: June 28, 2015 23:14 IST2015-06-28T23:14:42+5:302015-06-28T23:14:42+5:30

खामगाव बसस्थानकासमोरील घटना; काहीकाळ वाहतूक विस्कळीत.

The mini truck hit the bus | मिनी ट्रकची बसला धडक

मिनी ट्रकची बसला धडक

खामगाव : मालवाहू मिनीट्रकने एसटी बसला धडक दिली. या धडकेत एसटीच्या मागील बाजूचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. ही घटना रविवारी दुपारी १२.४५ वाजता बसस्थानकासमोर घडली. खामगाव बसस्थानकातून एम एच २0 बीएल २३६३ या क्रमांकाची औरंगाबाद आगाराची बस औरंगाबाद येथून नागपूरकडे जात होती. त्याचवेळी विरुद्ध दिशेने एमएच 0४ सीपी १४४८ या क्रमांकाचा मिनीट्रक नांदुरा रस्त्याकडे जात होता. दरम्यान, या मिनीट्रकच्या चालकाने आपले वाहन निष्काळजीपणे चालवून बसला जोरदार धडक दिली. यामध्ये बसच्या चालकाकडील बाजूचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. याप्रकरणी बस चालक यु.ई.सुरोशे यांच्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी मिनीट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे. या घटनेनंतर बसस्थानकासमोरील मुख्य रस्तावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. या घटनेची माहिती मिळताच स्थानक प्रमुख डी.ए.दलाल, बसस्थानक चौकीचे अनिल किटे, वाहतूक पोलिस पंढरीनाथ जाधव आदींनी घटनास्थळी दाखल होवून विस्कळीत झालेली वाहतूक तात्काळ सुरळीत करण्यात आली.

Web Title: The mini truck hit the bus