शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

सूक्ष्म सिंचन योजनेची थकबाकी १५ एप्रिलपर्यंत अदा होणार!

By admin | Updated: March 11, 2017 01:37 IST

आ. हर्षवर्धन सपकाळ यांच्या मागणीवर ना. फुंडकरांची ग्वाही.

बुलडाणा, दि. १0- सूक्ष्म सिंचन योजनेचे राज्यातील सर्व शेतकर्‍यांचे ६00 कोटींचे अनुदान १५ एप्रिलपर्यंंंत अदा केले जाईल, अशी ग्वाही राज्याचे कृषी मंत्री भाऊसाहेब फुंडकर यांनी शुक्रवारी विधानसभेत केली. नियम २९३ अन्वये उपस्थित चर्चेत आ. हर्षवर्धन सपकाळ यांनी सूक्ष्म सिंचन योजनेच्या अनुषंगाने शेतकर्‍यांची थकबाकी अदा करण्याबाबत केलेल्या मागणीच्या अनुषंगाने ना. फुंडकर यांनी सभागृहात हे आश्‍वासन दिले.अर्थसंकल्पीय अधिवेशनात नियम २९३ अन्वये जलयुक्त शिवार या विषयाच्या अनुषंगाने चर्चा उपस्थित करण्यात आली होती. या चर्चेत सहभागी होताना आ. हर्षवर्धन सपकाळ यांनी महाराष्ट्र राज्य हे सुजलाम् सुफलाम् करण्याची भाषा करणारे सत्ता पक्षाचे सरकार बुलडाणा जिल्ह्यातील २८ हजार शेतकर्‍यांना सूक्ष्म सिंचन योजनेची ८८ कोटींची थकबाकी अद्यापही देऊ शकलेले नाही. त्यामुळे सुजलाम् सुफलाम्च्या भाषेवर कितपत विश्‍वास ठेवावा, असा प्रश्न उपस्थित करून आ. हर्षवर्धन सपकाळ यांनी ठिबक व तुषार सिंचन योजनेच्या अनुदानामुळे शेतकर्‍यांवर ओढवलेली बिकट परिस्थिती विशद केली. यावेळी आ. सपकाळ म्हणाले की, एकनाथ महाराजांच्या माध्यमातून शेतकर्‍यांना सूक्ष्म सिंचन योजनेच्या थकबाकीचा दिलासा मिळेल, असे अपेक्षित होते; परंतु ते पावले नाहीत. आता मात्र साक्षात पांडुरंगच आमच्या जिल्ह्यात असल्यामुळे ते आम्हाला पावतील, असा विश्‍वास असल्याचे मिश्कील भाष्य यावेळी केले. यावेळी कृषी मंत्री ना. पांडुरंग फुंडकर म्हणाले की, महाराष्ट्रातील शेतकर्‍यांची ६00 कोटी रुपयांची सूक्ष्म सिंचनाची थकबाकी आहे. आ. हर्षवर्धन सपकाळ यांनी बुलडाणा जिल्ह्याची वस्तुस्थिती निदर्शनास आणून दिली आहे. त्या अनुषंगाने ३१ मार्चपर्यंंंतचे खोटे आश्‍वासन न देता १५ एप्रिलपर्यंंंत बुलडाणा जिल्ह्यातील २८ हजार शेतकर्‍यांच्या ८८ कोटी थकबाकीसह राज्याची ६00 कोटी रुपयांची थकबाकी शेतकर्‍यांना अदा केल्या जाईल, असे सांगितले.