शहरं
Join us  
Trending Stories
1
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
2
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
3
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
4
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
5
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
6
ह्युंडाई स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, काय काय फीचर्स असणार? टाटा पंच EV सह या कारना देणार टक्कर
7
जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार?
8
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
9
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
10
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
11
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
12
Top Marathi News Live Updates: राष्ट्रवादी अजितदादा गटाला सोडचिठ्ठी देणारे आनंद परांजपे शिंदेंच्या शिवसेनेत जाणार
13
CM देवेंद्र फडणवीसांनी चालवलेली बुलेट कुणाची? PUC वरून काँग्रेस-भाजपात का जुंपली?
14
PM मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद, अग्रगण्य कंपनीचा मोठा निर्णय; 'अनावश्यक खर्च' टाळण्यासाठी बनवला मास्टर प्लॅन
15
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
16
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
17
अंगावर शहारा आणणारी घटना! वादळात टीनशेडसोबत 'नन्हे मियाँ'ही उडाले अन्...; थरार कॅमेऱ्यात कैद -  बघा VIDEO
18
PM मोदींच्या आवाहनाला गडकरींचाही प्रतिसाद, बसने प्रवास करत केली पालखी महामार्गाच्या कामांची पाहणी; दौरा सुरू असतानाच...
19
PBKS vs MI : भावा कसा आहेस? रोहित शर्मा-श्रेयस अय्यरचा व्हिडिओ पाहिलात का?
20
Raj Thackeray : “२२ लाख मुलांचं आणि त्यांच्या कुटुंबीयांचं आयुष्य टांगणीला लागलं त्याचं काय?”, राज ठाकरेंचा सवाल
Daily Top 2Weekly Top 5

वैद्यकीय अधिकारी आंदोलनाच्या पावित्र्यात !

By admin | Updated: May 29, 2014 00:50 IST

२ जून पासून राज्य शासनाविरोधात तीव्र स्वरूपात असहकार कामबंद आंदोलन पुकारण्यात येणार असल्याचा ईशारा राज्य मॅग्मो संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी निवेदनाव्दारे दिला आहे.

चिखली : वैद्यकीय अधिकार्‍यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसदर्भात आंदोलनाच्या तयारीत असलेल्या महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी गट - अ (मॅग्मो) संघटनेला सन २0११ मध्ये आश्‍वासन देण्यात आले होते.परंतू चार वर्षाचा कालावधी उलटूनही मागण्यांची पूर्तता न झाल्यामुळे २ जून पासून राज्य शासनाविरोधात तीव्र स्वरूपात असहकार कामबंद आंदोलन पुकारण्यात येणार असल्याचा ईशारा राज्य मॅग्मो संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी निवेदनाव्दारे दिला आहे. अस्थायी ७८९ बीएएमएस वैद्यकीय अधिकारी गट ह्यबह्ण व अस्थायी जवळपास ३२ बीडीएस वैद्यकीय अधिकारी गट ह्यबह्ण यांचे सेवा समावेशन करण्यात यावे. राज्यातील सर्वच वैद्यकीय अधिकार्‍यांना सहावा वेतन आयोग लागू करण्यात यावा. आरोग्य अधिकार्‍यांना उच्च वेतन मिळावे. खातेंतर्गत पदोन्नतीचा प्रश्न मार्गी लावावा. वैद्यकीय अधिकार्‍यांचे कामांचे तास केंद्र शासन, इतर राज्यांप्रमाणे निश्‍चित करण्यात यावे, शासन दरबारी यापूर्वीच मान्य झालेल्या एनपीए ऐच्छिक असण्याबाबतची कारवाई तात्काळ करण्यात यावी, वैद्यकीय अधिकार्‍यांना एनपीए पुन:श्‍च चालू करण्यात यावा. सेवा अंतर्गत पदव्युत्तर अभ्याक्रमासंबंधी प्रलंबित जिव्हाळ्याचे प्रश्न व सेवेतील कार्यरत वैद्यकीय अधिकार्‍यांच्या दृष्टीने पदव्युत्तर अभ्यासक्रमांसंबंधी तात्काळ उचित आदर्श धोरणे ठरविण्यात यावीत. आरोग्य विभागाचा पुनर्रचना आयोग स्थापन करण्यात यावा. अशा विविध मागण्यांचे निवेदन जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकार्‍यांच्यावतीने जि.प.उपाध्यक्ष पांडूरंग पाटील यांना देण्यात आले असून या मागण्यांची पूर्तता न झाल्यास २ जून पासून तीव्र स्वरूपात असहकार आंदोलन छेडण्यात येईल असा ईशारा देण्यात आला आहे. यावेळी मग्मो संघटनेचे राज्य उपाध्यक्ष डॉ.निलेश टापरे, राज्य महिला प्रतिनिधी डॉ.उज्वला पाटील, राज्य कोअर कमिटी सदस्य डॉ.प्रविणकुमार निकस, जिल्हा सचिव डॉ.सांगळे, डॉ.जयंत पाटील, डॉ.दहातोंडे, डॉ.वाकोडे, डॉ.नारखेडे, डॉ.कोतकेनवार यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.