शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
2
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
3
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
4
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
5
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
6
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
7
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
8
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
9
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
10
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
11
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
12
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
13
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
14
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
15
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
16
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
17
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
18
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
19
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
20
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
Daily Top 2Weekly Top 5

बाजार समित्या बरखास्त

By admin | Updated: November 12, 2014 00:26 IST

बुलडाणा जिल्ह्यातील बाजार समित्यांवर प्रशासक नियुक्त करण्याचे आदेश प्राप्त.

बळीराम वानखडे / खामगाव (बुलडाणा)

         जिल्हय़ातील सात कृषी उत्पन्न बाजार समित्या बरखास्त करण्यात आल्या असून, त्या बाजार समितीवर शासनाचा प्रतिनिधी प्रशासक म्हणून नियुक्त करण्याचे आदेश जिल्हा उपनिबंधक बुलडाणा यांना प्राप्त झाले आहेत. बुलडाणा जिल्हय़ातील एकूण ९ पैकी ७ कृषी उत्पन्न बाजार समितीवरील अशासकीय संचालक मंडळ कार्यरत आहेत. यांचा कार्यकाळ संपल्यामुळे या बाजार समितीवर शासनातर्फे नियुक्त करण्यात आलेले प्रशासक उद्या १२ नोव्हेंबरपासून पदभार घेणार आहेत. यामध्ये बुलडाणा, जळगाव जा., संग्रामपूर, खामगाव, चिखली, मेहकर व दे. राजा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचा समावेश होता. जिल्ह्यातील मलकापूर व नांदुरा अशा दोन कृषी उत्पन्न बाजार समित्यासुद्धा बरखास्त करण्यात येणार आहेत; मात्र या दोन्ही बाजार समित्यांचे मंडळ बरखास्त करण्याच्या आदेशाला शासनानेच स्थगिती दिली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे उद्या १२ नोव्हेंबर रोजी नांदुरा व मलकापूर वगळता सात बाजार समित्यांवर शासकीय सदस्य प्रशासक म्हणून पदभार घेतील. *खामगाव बाजार समितीची निवडणूक प्रक्रिया सुरू जिल्हय़ातील सर्वात श्रीमंत असलेल्या खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असून, सचिव व गटविकास अधिकार्‍यांकडून मतदार याद्या मागविण्यात आल्या आहेत. खामगाव बाजार समितीचे वार्षिक उत्पन्न हे ७ कोटी ७0 लाख २६ हजार ३३0 रुपये आहे. या बाजार समितीमध्ये एकूण १८ संचालक निवडून द्यायचे असतात. या सर्व संचालक निवडीची प्रक्रिया ३0 ऑक्टोबर १४ पत्र क्र. १२९३६ अन्वये सुरू झाली आहे.