शहरं
Join us  
Trending Stories
1
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
2
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
3
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
4
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
5
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
6
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
7
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
8
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
9
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
10
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
11
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
12
पेट्रोल-डिझेल गाड्या इतिहासजमा होणार; नितीन गडकरींचा वाहन उत्पादकांना इशारा...
13
IPL 2026: अजब गजब आरोप! वैभव सूर्यवंशीच्या बॅटबद्दल बोलताना PAK एक्सपर्टने तोडले अकलेचे तारे
14
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
15
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'ची क्रेझ! प्रदर्शनाआधीच हजारो तिकिटांची विक्री; वाचा रिपोर्ट
16
कंपन्या AI साठी कर्मचाऱ्यांना काढतायत नंतर पस्तावतायत! पगारापेक्षा जास्तच होतोय खर्च, काय म्हणतायत कंपन्यांचे सीईओ... 
17
तिसऱ्यांदा बोनस शेअर देणार 'ही' बँक; पाहा किती Shares मिळणार? डिविडंडचीही घोषणा
18
‘शिवाजी कोण होता?’ वाचनावरून तणाव; पोलिसांनी आंदोलन चिरडल्याचा आरोप
19
रविंद्र जडेजाची बहीण काँग्रेसच्या तिकीटावर लढली, हरली! गुजरातमध्ये १० महानगरपालिकांवर भाजपचा ताबा
20
“अरविंद केजरीवाल कार्यालयात महात्मा गांधींची प्रतिमा का लावत नाहीत”; काँग्रेसचा थेट सवाल
Daily Top 2Weekly Top 5

अनेक ‘एटीएम’चे शटर डाउन!

By admin | Updated: April 18, 2017 01:05 IST

खामगाव- बँकांमध्ये तीव्र स्वरूपाचा चलन तुटवडा निर्माण झालेला असून, अनेक एटीएमचे शटर डाउन झालेले आहेत. त्यामुळे ग्राहकांना त्रास सहन करावा लागत आहे.

खामगाव : गेल्या चार दिवसांपासून राष्ट्रीयीकृत बँकांना आरबीआयकडून रोकडच मिळालेली नाही. त्यामुळे बँकांमध्ये तीव्र स्वरूपाचा चलन तुटवडा निर्माण झालेला असून, अनेक एटीएमचे शटर डाउन झालेले आहेत. त्यामुळे ग्राहकांना त्रास सहन करावा लागत आहे.नोटबंदीच्या निर्णयानंतर निर्माण झालेल्या चलन तुटवड्यातून बँका सावरत असतानाच आरबीआयकडून रोख रक्कम मिळणे अनियमित झाले आहे. त्यामुळे बँकांना दैनंदिन व्यवहार करण्यास अडचणी निर्माण झालेल्या आहेत. मागील चार दिवसांपासून आरबीआयकडून रोकड मिळाली नसल्याची माहिती एका राष्ट्रीयीकृत बँकेच्या व्यवस्थापकाने दिली. पैसे काढायला आलेल्या ग्राहकांना देण्यासाठी बँकांकडे पैसा नाही. त्यामुळे जेवढे पैसे जमा झाले, तेवढेच वाटप केले जात आहेत. परिणामी खात्यात पैसे जमा असूनही ग्राहकांना कमी पैसे दिले जात आहेत. तसेच एटीएममध्ये रक्कम टाकणे अनेक बँकांनी बंद केले असून, एटीएम केंद्रांचे शटर लावून कुलूप ठोकण्यात आले आहे. केवळ आयसीआयसीआय, एचडीएफसी अशा निवडक बँकांच्या एटीएममध्ये रक्कम टाकली जात आहे; परंतु तेथेही गर्दी होत असल्याने तास-दोन तासात पैसे संपून जातात. पैशांची निकड असलेले अनेक ग्राहक संध्याकाळी या एटीएमवरून त्या एटीएमवर चकरा मारताना दिसतात. पण, त्यांच्या पदरी निराशाच पडत आहे. एकंदरित तीव्र स्वरूपाचा चलन तुटवडा निर्माण झालेला असून, ग्राहकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे.