शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
शिंदेंच्या शिवसेनेचे तीन उमेदवार जाहीर होणार, रवींद्र वायकरांसह ही चार नावं चर्चेत
3
गोवंडीत महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; अज्ञातांवर गुन्हा
4
धक्कादायक! कोरोनावरील या लसीमुळे होऊ शकतात साईड इफेक्ट्स, कंपनीने स्वत:च दिली कबुली    
5
Kalpana Soren Net Worth : कल्पना सोरेन आहेत करोडपती; पतीपेक्षा चारपट जास्त संपत्ती, जाणून घ्या...
6
कार्यकर्तेच ठरविणार विजयाचा गुलाल...! शाहू छत्रपती आणि मंडलिक लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष
7
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
8
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
9
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
10
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
11
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
12
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
13
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
14
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
15
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
16
१८% ‘कलंकित’; २९% कोट्यधीश; तिसऱ्या टप्प्यातील १,३५२ उमेदवारांकडे आहे ५.७७ कोटींची सरासरी संपत्ती
17
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
18
राजन विचारे यांच्या मालमत्तेत ११ कोटींची वाढ; रत्नागिरी जिल्ह्यात शेतजमीन
19
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
20
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं

Maharashtra Election 2019 : खामगाव मतदारसंघात तिहेरी लढतीचे चित्र!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 04, 2019 3:55 PM

भाजप- काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीत तिहेरी लढत होणार असल्याची स्थिती सद्यस्थितीत दिसून येत आहे.

- अनिल गवईखामगाव : बुलडाणा जिल्ह्यातील सर्वाधिक प्रतिष्ठेच्या असलेल्या खामगाव मतदारसंघात काँग्रेस पक्षाच्या उमदेवारीचा तिढा अखेर गुरूवारी सुटला. या मतदारसंघातून काँग्रेस महाआघाडीच्यावतीने शेगाव येथील नेते ज्ञानेश्वरदादा पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला. त्यामुळे या मतदार संघात आता भाजप- काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीत तिहेरी लढत होणार असल्याची स्थिती सद्यस्थितीत दिसून येत आहे.खामगाव विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्ष-शिवसेना महायुतीकडून विद्यमान आमदार अ‍ॅड. आकाश फुंडकर यांचे नाव पहिल्याच यादीत निश्चित झाले. वंचित बहुजन आघाडीकडून शरद वसतकार यांना उमेदवारी देण्यात आली. यामतदार संघातून काँग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडीकडून माजी आमदार आणि खामगाव मतदारसंघातील मातब्बर नेते दिलीपकुमार सानंदा यांची उमेदवारी निश्चित मानली जात होती. मात्र, त्यांनी ऐनवेळी विधानसभा निवडणुकीत माघार घेतली. त्यामुळे खामगाव मतदारसंघात प्रबळ उमेदवार शोधण्यासाठी पक्षनेतृत्वाला ऐनवेळी धावपळ करावी लागली.दिलीपकुमार सानंदा यांनी उमेदवारी नाकारल्यानंतर धनंजय देशमुख आणि काँग्रेस सेवादलाचे जिल्हाध्यक्ष तेजेंद्रसिंह चव्हाण आणि त्यांच्या पत्नी राजकुमारी चव्हाण यांच्यापैकी एकाची उमेदवारी निश्चित मानली जात होती. मात्र, धनंजय देशमुख यांनी माजी आमदार दिलीपकुमार सानंदा निवडणूक लढणार असतील, तर आपण निवडणूक लढणार नसल्याची भूमिका पक्षनेतृत्वाकडे व्यक्त केली. त्यानंतर तेजेंद्रसिंह चव्हाण यांची उमेदवारी निश्चित मानली जात असतानाच, तेजेंद्रसिंह चव्हाण यांच्या उमेदवारीला काँग्रेसच्याच एका गोटातून तीव्र विरोध करण्यात आला.तेजेंद्रसिंह चव्हाण यांच्या उमेदवारीला काँग्रेस पक्षाच्याच एका प्रबळ गटाकडून होत असलेल्या विरोधानंतर काँग्रेसनेते ज्ञानेश्वरदादा पाटील यांचे नाव अचानक चर्चेत आले.गुरूवारी ज्ञानेश्वरदादा पाटील यांची उमेदवारी झाल्याने, खामगाव मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवारीचा तिढा अखेर सुटला आहे. परिणामी, खामगाव मतदारसंघात आता भाजप-काँग्रेस आणि वंचित आघाडीत तुल्यबळ लढत होणार असल्याचे चित्र आहे.वंचितचे उमेदवार शरद वसतकार यांनी गुरूवारी आपल्या समर्थकांच्या उपस्थितीत निवडणूक कार्यालयात आपला नामांकन अर्ज दाखल केला. तर काँग्रेसचे अधिकृत उमेदवार ज्ञानेश्वरदादा पाटील आणि भाजपचे उमेदवार अ‍ॅड. आकाश फुंडकर शुक्रवारी शक्तीप्रदर्शनाद्वारे अर्ज भरणार असल्याचे चित्र आहे. त्याचप्रमाणे इतर राजकीय पक्ष आणि अपक्ष उमेदवार उद्या शुक्रवारीच अर्ज दाखल करणार आहेत. त्यानंतरच या मतदारसंघातील लढतीचे खरे चित्र स्पष्ट होईल, असे दिसून येते.

‘स्वाभीमानी’ शेतकरी संघटनेचा बार फुसका!काँग्रेस-राष्ट्रवादी-रिपाइं-स्वाभीमानी महाआघाडीत खामगाव विधानसभा मतदारसंघाची जागा ही स्वाभीमानी शेतकरी संघटनेला सोडण्यात आल्याची चर्चा बुधवारी सायंकाळपासून रंगली होती. स्वाभीमानीचे कैलास फाटे यांना स्वाभीमानीचे नेते राजू शेट्टी यांच्या स्वाक्षरीचा एबी फॉर्मही देण्यात आला होता. दरम्यान, गुरूवारी दुपारी उशीरा घडलेल्या घडामोडीत खामगाव मतदारसंघातून काँग्रेस महाआघाडीकडून ज्ञानेश्वरदादा पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यामुळे खामगाव विधानसभा मतदारसंघाची जागा स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या वाट्याला गेल्याची केवळ चर्चा ठरली. काँग्रेसचे अधिकृत उमेदवार ज्ञानेश्वरदादा पाटील उद्या शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यामुळे ऐन उमेदवारी अर्ज भरण्याच्या तोंडावर स्वाभीमानी शेतकरी संघटनेची खामगाव मतदारसंघात चांगलीच पंचाईत झाल्याचे दिसून येते.

टॅग्स :khamgaon-acखमगावMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019congressकाँग्रेसBJPभाजपा