सुर्याेदय समयी माॅ साहेब जिजाऊंची महापूजा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2022 11:47 AM2022-01-12T11:47:38+5:302022-01-12T11:51:06+5:30

Jijau Janmotsav : पालकमंत्री डाॅ़ राजेंद्र शिंगणे यांच्यासह लखुजी राजे जाधव यांचे वंशज उपस्थित हाेते़.  

Mahapuja of Maa Saheb Jijau at sunrise | सुर्याेदय समयी माॅ साहेब जिजाऊंची महापूजा 

सुर्याेदय समयी माॅ साहेब जिजाऊंची महापूजा 

Next

सिंदखेड राजा : माॅ साहेब जिजाऊंच्या जयंतीनिमित्त मातृतिर्थ सिंदखेड राजा येथे १२ जानेवारी राेजी सुर्याेदयी समयी सकाळी ६ वाजता महापूजा करण्यात आली़ काेराेनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या निर्देशाचे पालन करून साधेपणाने ही महापूजा झाली़. यावेळी पालकमंत्री डाॅ़ राजेंद्र शिंगणे यांच्यासह लखुजी राजे जाधव यांचे वंशज उपस्थित हाेते़.  
सूर्योदयी पालकमंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी शासकीय पूजन केले. सामाजिक कार्यकर्ते अॅड.संदीप मेहेत्रे यांच्यासह शासकीय अधिकारी यावेळी उपस्थित होते.तसेच उपविभागीय अधिकारी भूषण अहिरे,तहसीलदार सुनील सावंत, पंचायत समिती गटविकास अधिकारी डॉ.कृष्णा वेनिकर,पालिका मुख्याधिकारी प्रशांत व्हटकर यांनी माॅ साहेब जिजाऊंना अभिवादन केले़ स्वभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर व माजी आमदार डॉ.शशिकांत खेडेकर यांनी परिवारासह जिजाऊ पूजन केले. काेराेनाच्या पार्श्वभूमीवर कार्यक्रमाला ५० लाेकांचीच परवानगी जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेली आहे़. त्यामुळे, गतवर्षीप्रमाणाचे यंदाही काेराेना नियमांचे पालन करीत हा कार्यक्रम घेण्यात येत आहे़.

Web Title: Mahapuja of Maa Saheb Jijau at sunrise

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.