जीवनगौरव पुरस्काराने चांडक सन्मानित

By Admin | Updated: June 25, 2014 00:02 IST2014-06-24T23:49:34+5:302014-06-25T00:02:28+5:30

कोल्हापूर येथील अविष्कार फाऊंडेशनचा पुरस्कार : सहकार क्षेत्रातील योगदानाची नोंद

Lifetime Achievement Award | जीवनगौरव पुरस्काराने चांडक सन्मानित

जीवनगौरव पुरस्काराने चांडक सन्मानित

बुलडाणा : कोल्हापूर येथील अविषकार फाऊंडेशनच्या वतिने दिला जाणार्‍या जीवनगौरव पुरस्कारने बुलडाणा अर्बनचे संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक यांना सन्मानीत करण्यात आले.
स्थानिक सहकार सेतू सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार राजेश राजोरे हे होते तर मंचावर अविष्कार फाऊंडेशनचे संजय पवार, रामदादा मोहीते, माजी आमदार बाबुराव पाटील, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष समाधान सावळे उपस्थित होते. सन्मानचिन्ह, सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते. यावेळी बोलतांना चांडक यांनी हा पुरस्कार म्हणजे सहकार चळवळीवर व्यक्त केलेलो विश्‍वास आहे, मुळातच सहकाराची ह्यविश्‍वासह्ण ही एक अक्षरी व्याख्या असुन बुलडाणा अर्बनच्या सामाजीक बांधीलकीचाही गौरव असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. मोहीते यांनी पुरस्कारामागील भावना व्यक्त केली. जेष्ठ पत्रकार राजोरे यांनी हा चांडक यांनी पुरस्कार स्विकारल्याने पुरस्काराची उंची वाढल्याचे नमूद केले. संचालन प्रख्यात कवी अजीम नवाज राही यांनी तर आभार प्रदर्शन पत्रकार राजेंद्र काळे यांनी व्यक्त केले.

Web Title: Lifetime Achievement Award