शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

‘एलसीबी’कडून पालिकेची झाडाझडती!

By admin | Updated: May 2, 2017 23:51 IST

खामगाव: शहरातील एका व्यायाम शाळेच्या दुरुपयोगप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेसोबतच स्थानिक पोलिसांच्यावतीने मंगळवारी सायंकाळी खामगाव पालिकेत चौकशी करण्यात आली.

खामगाव: शहरातील एका व्यायाम शाळेच्या दुरुपयोगप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेसोबतच स्थानिक पोलिसांच्यावतीने मंगळवारी सायंकाळी खामगाव पालिकेत चौकशी करण्यात आली. मुख्याधिकारी रजेवर असल्याने, उपस्थित कर्मचाऱ्यांनी एलसीबी आणि स्थानिक पोलिसांना अपेक्षित सहकार्य केले नसल्याचे समजते. खामगाव नगरपालिकेने २८ फेब्रुवारी रोजी झालेल्या सभेत शिवाजी व्यायाम मंदिराचा दुरुपयोग केल्याचा ठपका ठेवत, माजी आमदार दिलीपकुमार सानंदा आणि शिवाजी व्यायाम मंदिराचे अध्यक्ष गोकुलचंद सानंदा यांच्या विरोधात ठराव पारित केला आहे. या ठरावानुसार, गुन्हा दाखल होण्याच्या आशंकेने माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी गेल्या गुरुवारी खामगाव न्यायालयातून अटकपूर्व जामीन मिळविला आहे. तथापि, गुन्हा दाखल नसतानाही सानंदांनी ४ मेपर्यंत जामीन मिळविल्याने, याप्रकरणी पालिका प्रशासनाची बाजू ऐकून घेण्यासाठी शिवाजी नगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष ताले यांनी पालिकेत धडक दिली. त्याचप्रमाणे याच प्रकरणाच्या चौकशीसाठी एलसीबीचे निरीक्षक शिकरे यांनीही पालिकेत धडक दिल्याने, पालिकेत उपस्थित कर्मचाऱ्यांची चांगलीच धावाधाव झाली.मुख्याधिकाऱ्यांची अनुपस्थिती, कर्मचाऱ्यांचे कानावर हात!खामगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी प्रशांत रोडे ७ मेपर्यंत दीर्घ रजेवर गेले आहेत. या पार्श्वभूमीवर शिवाजी व्यायाम शाळाप्रकरणी चौकशीसाठी पालिकेत दाखल झालेल्या एलसीबी निरीक्षकांसह, शिवाजी नगर पोलीस स्टेशनच्या निरीक्षकांना रिकाम्या हाताने परतावे लागल्याची चर्चा आहे. मुख्याधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीत कर्मचाऱ्यांनी कानावर हात ठेवल्याची चर्चा पालिका वर्तुळात होती.