दागिने चमकून देण्याच्या बहाण्याने लाखोचा ऐवज लंपास

By Admin | Updated: April 23, 2017 00:55 IST2017-04-23T00:55:49+5:302017-04-23T00:55:49+5:30

दागिने चमकून देण्याच्या बहाण्याने विविध प्रकारे बतावणी करून लाखोचा ऐवज लंपास

Lakhs of millions of people make fun of jewelery | दागिने चमकून देण्याच्या बहाण्याने लाखोचा ऐवज लंपास

दागिने चमकून देण्याच्या बहाण्याने लाखोचा ऐवज लंपास

बुलडाणा: दागिने चमकून देण्याच्या बहाण्याने विविध प्रकारे बतावणी करून लाखोचा ऐवज लंपास केल्याची घटना येथील एचडीएफसी चौक परिसरात २२ एप्रिल रोजी सकाळी ११.३0 वाजेच्या सुमारास घडली. एचडीएफसी चौकातील जिजामाता महाविद्यालयातील सेवानवृत्त प्राध्यापक रमेश देशमुख यांच्या बंगल्यात दोन अज्ञात आरोपींनी प्रवेश करून विविध प्रकारची बतावणी करून घरातील विविध देवाच्या मूर्ती चमकून दिल्या. त्यांनी दागिनेही चमकून देतो, असे सांगितले. त्यामुळे दागिने काढून दिल्यानंतर आरोपींनी ते दागिने कुकरमध्ये टाकून १0 मिनिटांनी कुकर उघडा अशा सूचना देऊन निघून गेले. आरोपी बंगल्याच्या बाहेर पडल्यानंतर रंजना यांना संशय आला. त्यानंतर दागिने लंपास झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.

Web Title: Lakhs of millions of people make fun of jewelery