शहरं
Join us  
Trending Stories
1
Gold Rate Prediction: सोने तब्बल २७ हजारांनी महाग होणार; डॉलर वाचविण्यासाठी केंद्र सरकारचा ‘सोन्या’वर घाव
2
'नीट'ला नाट : पेपरफुटीप्रकरणी सीबीआयचे छापे, ५ जणांना अटक; डॉक्टरांची संघटना एनटीएविरोधात सर्वोच्च न्यायालयात
3
पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीच्या संपर्कातील युवकांना एटीएसने घेतले ताब्यात; ५७ जण रडारवर
4
Gold Silver Rate:आयात शुल्कवाढीचा झटका; सोने ८ हजार रुपये, तर चांदी २० हजारांनी महागली
5
Mhada Lottery 2026: म्हाडा घरांच्या लॉटरीला दुसऱ्यांदा मुदतवाढ; आता कोणत्या तारखेपर्यंत अर्ज करता येणार? 
6
11th admission: अकरावी प्रवेशावेळी तांत्रिक अडचणी, शेकडो पालक-विद्यार्थ्यांना मनस्ताप
7
संकट दारात उभे; पण कोणाकडेही उत्तर नाही; उद्योगपती उदय कोटक यांचा भारतीयांना धोक्याचा इशारा
8
पीएम मोदींसह अनेक मंत्र्यांनी केली ताफ्यात 'काट'कसर; भाजपशासित मुख्यमंत्र्यांनीही केल्या अनेक उपाययोजना
9
‘देवाभाऊं’चा एक फोन अन् तत्काळ प्रश्न सुटला; CM फडणवीसांनी अधिकाऱ्यांना सुनावलं, नेमकं काय घडलं?
10
प्रवाशांना मोठा दिलासा, विदर्भातून गोव्याला जाणारी ट्रेन नियमित केली; नाशिक-मुंबईकरांना लाभ!
11
Virat Kohli New World Record : किंग कोहलीचा शतकी धमाका! अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
12
IPL 2026 : चेज मास्टर विराट कोहली सेंच्युरीसह पुरुन उरला! KKR ला पराभूत करत RCB अव्वल ठरला
13
पुण्यातील सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये बॉम्बसदृश्य वस्तू; रुग्ण-नागरिकांमध्ये खळबळ अन् घबराट
14
आकाशात संकट! एअर इंडियाच्या अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणांना 'ब्रेक'; जगभरात ६ हजारांहून अधिक उड्डाणं 'लेट' 
15
IPL 2026: KKR विरुद्ध खाते उघडल्यावर किंग कोहलीचं 'शतकी सेलिब्रेशन'; RCB चे चाहतेही झाले शॉक (VIDEO)
16
अमूलनंतर आता मदर डेअरीचाही दणका! दूध महागलं, म्हशीच्या दुधापासून फुल क्रीमपर्यंत नवे दर जाहीर; पहा संपूर्ण यादी
17
RCB vs KKR : मुंबईकर रघुवंशीची तुफान फटकेबाजी; किंग कोहलीनंही टाळ्या वाजवत दिली दाद (VIDEO)
18
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून EV वाहनाचा वापर सुरू, ताफ्यातील वाहनेही केली कमी
19
महागाईचा झटका, अमूलने दुधाचा भाव वाढवला! कधीपासून लागू होणार नवे दर? जाणून घ्या 
20
IPL All Time Record : किंग कोहलीनं रचला इतिहास; MS धोनीचा महारेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

देऊळगावराजा शहरात स्वच्छतेचा अभाव, नाल्या तुंडूब भरल्या

By admin | Updated: June 16, 2014 00:52 IST

ऐन पावसाळा तोंडावर आलेला असतांनाही शहरातील नाल्या, घाण पाणी आणि कचर्‍याने तुडूंब भरल्या आहेत.

देऊळगावराजा : देऊळगावराजा नगर पालिकेच्या गलथान कारभारात अद्यापही सुधारणा होत नसून ऐन पावसाळा तोंडावर आलेला असतांनाही शहरातील नाल्या, घाण पाणी आणि कचर्‍याने तुडूंब भरल्या आहेत. नागरिकांचे आरोग्य जपण्याच्या दृष्टीने त्वरीत नाल्या साफ करण्याची मागणी होत आहे.

शहरात नगर पालिकेचे एकूण चार प्रभाग आहेत आणि सतरा नगरसेवक शहराचे प्रतिनिधीत्व करतात. शहरवासियांना उत्तम सोयी सुविधा पुरविण्याची जबाबदारी नगर पालिकेची असतांना त्यादृष्टीने कारभार होत नाही. शहरातील नाल्यांची स्थिती स्वच्छतेच्या दृष्टीने विचार करायला लावणारी आहे. मृग नक्षत्रानंतर कोणत्याही क्षणी पाऊस येवू शकतो. त्यापुर्वी नाल्यांमध्ये साचलेले घाण पाणी आणि कचरा साफ करण्याचे कामाचा नगर पालिकेला विसर पडल्याचे दिसून येते. पावसाचे आगमन झाल्यानंतर याच अस्वच्छतेमुळे रोगराई निर्माण होवून नागरिकांच्या व लहान मुलांच्या आरोग्याला बाधा पोहचू शकते. ही बाब दुर्लक्षित करण्यासारखी नाही. शिवसेनेचे नगरसेवक नंदन खेडेकर यांनी मुख्याधिकारी यांना याबाबतचे निवेदन दिल्यानंतरही नाल्यांची स्वच्छता करण्याची तत्परता न.प.ने दाखविली नाही. नाल्यांमध्ये साचलेले घाणपाणी, हवेमुळे त्यता जावून पडणारा कचरा, महिनोमहिने स्वच्छता होत नसल्याने अक्षरश: या परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. मेनरोड वरील काही दुकानात खरेदी करण्यासाठी गेल्यानंतर दुर्गंधीमुळे ग्राहकांचा जीव कासावीस होतो. तर दुकानदारांना या बाबीचा किती त्रास होत असेल. त्याचबरोबर शहरातील अंतर्गत भागातही घराच्या समोर हीच समस्या असल्याने वयोवृध्द नागरिक व बाल गोपाळांना हा त्रास मुकाटपणे सोसावा लागत आहे. शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ नये यासाठी सुस्तावलेली नगरपालिका साफसफाईची मोहिम कधी सुरू करणार याकडे शहरवासियांचे लक्ष लागून आहे.