शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

दुकानांवर कामासाठी बालमजूर!

By admin | Updated: June 7, 2017 00:15 IST

विविध चौकातील चित्र : चहा टपऱ्या, वाहनदुरुस्ती व भंगार व्यवसायिकांकडे करतात काम

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : खेळण्या - बागडण्याच्या आणि शिक्षण घेण्याच्या वयात अंगमोड मेहनत करून पोटाची खळगी भरण्यासाठी लहान मुलांना धडपड करावी लागत असल्याचे विदारक चित्र शहरातील विविध चौकामध्ये दिसत आहे. शहरातील चहाच्या टपऱ्या, वाहनदुरुस्तीचे दुकान, भेलचाटच्या गाड्यावर बरीच अल्पवयीन मुले काम करतांना लोकमतने ६ जून रोजी केलेल्या स्टिंग आॅपरेशनमध्ये आढळून आले.शहरात लघू व्यवसायीकांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने येथे काम करण्यास कामगारांची मोठी गरज भासते. एका मजुराला सरासरी २०० ते ३०० रुपये दैनंदिन मजुरी द्यावी लागते. मात्र, त्याच ठिकाणी जर १६ वर्षांतील लहान मुल ५० ते १०० रुपय मजुरीवर काम करण्यासाठी तयार होतात. याचा फायदा घेत, शहरातील चहाच्या टपऱ्या, लोखंड भंगार व्यवसायीक व इतर लहान व्यवसायीक अश्या बालकांना कामावर ठेवतात.उद्योगातील बालकामगारांना बाहेर काढावे, त्यांच्यासाठी शिक्षणाचा मार्ग खूला व्हावास साठी शासनाकडून विविध योजना राबविल्या जातात. हॉटेलमध्ये काम करणारी, रस्त्यावर फिरून बूटपॉलिश करणारी, गवंड्याच्या हाताखाली काम करणाऱ्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यास शासनाला अद्यापही यश आलेले नाही. शिवाय जिल्हा कामगार विभागाचे लक्ष नसल्यामुळे शहरातील लहान मोठ्या दुकानात अल्पवयीन मुल राबतांना आढळून येतात.चहा टपऱ्यांवर सर्वाधिक लहान मुलेशहरातील प्रत्येक चौकात व शासकीय कार्यालय परिसरात बऱ्याच चहाच्या टपऱ्या व नास्ता सेंटर आहे. यातील बऱ्याच दुकानांवर १६ वर्षाखालील मुल राबतांना दिसतात. यातील बरे मुल आर्थिक व शैक्षणिकदृष्या मागास कुटूंबितील व ग्रामीण भागातील आहे. जयस्तंभ चौकातील विविध दुकानांवर असा एक अल्पवयीन मुलगा चहा वाटप करणांना लोकमत चमूला आढळून आला. पाणी वाटपाची जवाबदारी बालकांकडे!शहरातील काही चौकात सायंकाळी नास्त सेंटर व फास्टफुटचा गाड्या लावल्या जातात. अन्न शिजविण्यासाठी सायंकाळपुर्वी या गाड्यावर पाणी पोहचविण्याची जवाबदारी काही बालकांवर देण्यात आली आहे. त्यामुळे नजिकच्या बोअरवेल, विहीरी, पाणी विक्री संस्थांकडून तसेस व्यवसायीकांच्या घरून लहानमुल दुकांनावर आॅटोतून पाणी पोहविण्याचे काम करतांना आढळून आले.