अज्ञात वाहनाच्या धडकेत इसम ठार

By Admin | Updated: July 6, 2015 01:52 IST2015-07-06T01:52:31+5:302015-07-06T01:52:31+5:30

नांदुरा येथील दूध डेअरीसमोरील घटना.

Killed in an unknown vehicle | अज्ञात वाहनाच्या धडकेत इसम ठार

अज्ञात वाहनाच्या धडकेत इसम ठार

नांदुरा (जि. बुलडाणा): येथील दूध डेअरी रोडवर असलेल्या जिजाऊ नगरातील रहिवासी सुभाष वसंतराव कुलथे (वय ५५) यांचा ४ जुलै रोजी रात्री अज्ञात वाहनाची धडक लागून मृत्यू झाला. सदर घटना खामगाव नाक्याजवळ घडली. सुभाष कुलथे हे खामगाव नाक्याजवळ असलेल्या एका गोडावूनवर रात्रपाळीत सुरक्षा कर्मचारी म्हणून कामाला होते. कामावर जात असताना रस्ता ओलांडत असताना अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली.

Web Title: Killed in an unknown vehicle