शहरं
Join us  
Trending Stories
1
Pm Modi Five Nation Tour : पीएम मोदींचा ५ देशांचा दौरा सुरू! 'UAE'मध्ये होणार भव्य स्वागत; कोणत्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित केले जाणार?
2
शेअर बाजाराचा 'जोश हाय'; Sensex-Nifty मधील तेजीनं गुंतवणूकदारांच्या अपेक्षा वाढल्या, 'या' क्षेत्रातील शेअर्स सुस्साट...
3
Petrol Diesel Price Hike: पहिले दूध, नंतर CNG आणि आता पेट्रोल-डिझेल महागलं... ज्याची भीती होती तेच झालं, ४८ तासांत ३ मोठे झटके
4
India-Russia Oil Import News: फक्त २४ तास बाकी! रशियन तेलाला 'ब्रेक'; भारतात पेट्रोल-डिझेलचा तीव्र तुटवडा निर्माण होणार?
5
Petrol Diesel Price: पेट्रोल- डिझेलच्या दरात वाढ; सर्वसामान्यांच्या खिशावर नेमका काय परिणाम होणार? जाणून घ्या
6
सामान्यांचा खिसा आणखी रिकामा; महागाईचा ४२ महिन्यांचा उच्चांक; महागाईत सर्वाधिक तीव्र वाढ
7
डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचे निधन; ६८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
Sunil Bharti Mittal: अदानी-अंबानींच्या मार्गावर सुनील मित्तल; १० वर्षांत सोडणार Airtel ची खुर्ची, कोण असेल उत्तराधिकारी?
9
व्हॉट्सॲपवर ‘एआय’सोबतच्या गप्पा राहणार आता अतिशय गुप्त!
10
Petrol Diesel price hike: महागाईच्या झळा सुरू, पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ! प्रति लिटर ३ रुपयांनी महाग झाले इंधन
11
सेन्सेक्स लवकरच ८९ हजारांवर? ‘मॉर्गन स्टॅन्ले’चा अहवाल; १५ टक्के वाढीचा अंदाज
12
आजचे राशीभविष्य - १५ मे २०२६, आर्थिक स्थिती मजबूत दिसेल; गैरसमजा पासून जपून राहावे
13
नॉर्मल पेट्रोल आणि प्रीमियम पेट्रोल म्हणजे काय? दोन्हीच्या किमतीत किती फरक असतो? जाणून घ्या...
14
अग्रलेख : अजितदादा, हे पाहताय ना?
15
'नीट'चे पेपरचोर रडारवर, अधिकाऱ्यांवरही संशय; पुण्यातील महिलेच्या २१ बँक खात्यांत लाखोंचे व्यवहार
16
राखीव प्रवर्गाची सवलत घेतलेल्या उमेदवारांना खुल्या प्रवर्गात ‘नो एंट्री’, राज्य सरकारचा मोठा निर्णय
17
विशेष लेख: महाराष्ट्रातही लाखो मतदार वगळले जातील का?
18
चिनी जहाजांसाठी होर्मुझ पुन्हा उघडले; ट्रम्प-जिनपिंग चर्चा सुरू असताना इराणचा निर्णय
19
उत्तर प्रदेशात पावसाच्या जोरदार तडाख्याने १११ जणांचा मृत्यू; एक जण ५० फूट उडाला
20
महाराष्ट्रात एसआयआर; ३० जूनपासून होणार मतदारांची पडताळणी; १६ राज्ये, ३ केंद्रशासित प्रदेशांमध्ये तिसरा टप्पा  
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामस्वच्छता अभियानाला ‘खो’

By admin | Updated: May 13, 2014 21:45 IST

तालुक्यात ग्रामस्वच्छता अभियानाला खो दिला जात असल्याने साथीच्या आजारांनी डोके वर काढण्यास सुरुवात केली आहे.

सिंदखेडराजा : गाजावाजा करुन ग्रामस्वच्छता अभियान राबविण्यात करण्यात आले होते. मात्र तालुक्यात ग्रामस्वच्छता अभियानाला खो दिला जात असल्याने साथीच्या आजारांनी डोके वर काढण्यास सुरुवात केली आहे. संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान तसेच गोद्रीमुक्त गाव या कार्यक्रमाचा ग्रामीण भागात बहुतांश गावामध्ये फज्जा उडाला असून, पंचायत समिती स्तरावरुन या अभियानाचा पुन्हा उठाव करण्याची गरज भासू लागली आहे. ग्रामीण भागात आरोग्यमान उंचाविण्याकरीता संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान संपूर्ण महाराष्ट्रात चालू आहे. ग्रामीण भागातील उघड्यावर शौचास जाणे बंद करण्याकरीता केंद्र सरकार निर्मल ग्राम ही योजना राबवित आहे. याकरीता पुरस्कार योजना सुद्धा आहे. सिंदखेडराजा तालुक्यात जागदरी, महारखेड, आंबेवाडी, भोसा, डावरगाव, तढेगाव ही गावे ग्रामस्वच्छता अभियानात बसली. महारखेड गावाने ५ लाखाचे तर इतर गावांनी ५0 हजार ते ३ लाख रुपयांपर्यंत बक्षिसाची रक्कम मिळविली आहे. या अभियानाचा मुळ उद्देश ग्रामीण भागातील आरोग्यमान उंचावणे आहे. ग्रामीण भागात रस्त्याच्या दोन्ही कडेला उघड्यावरच शौचविधीमुळे सर्वाधिक प्रदुषण होत आहे. त्यामुळे ग्रामीण भागात वारंवार साथीचे रोग पसरतात. हिवरा गडलींग, हनवतखेड या दोन्ही गावात अज्ञात तापाने उच्छाद मांडला आहे. याचे मुळ कारण साचलेली गटारे आणि उघड्यावर शौचास बसणे अशीच आहे. वारंवार उद्भवणार्‍या सोयी व रोगराईस आळा घालायचा असेल, तर स्वच्छतेशी निगडीत एकूण घटकांबरोबर शौचालयाचा योग्य व नियमीत वापर जनतेने करणे अनिवार्य आहे. बुलडाणा जिल्ह्यात महारखेड अव्वल येत असतांना साखरखेर्डा गावाचे नाव अस्वच्छतेच्या यादीतही अव्वल आहे. शासनाने हे दोन्ही पुरस्कार जाहीर केले तर निश्‍चीतच अत्यंत गलीच्छ वस्ती म्हणून ग्रामीण विभागात महाराष्ट्रात अव्वल क्रमांक मिळाला तर नवल वाटू नये. घरात शौचालय असतांना काही कर्मचारी आजही प्रातविधीसाठी बाहेर जातांना दिसतात. साखरखेर्डा, शेंदुर्जन, मलकापूर पांग्रा, वरोडी, सवडद, मोहाडी, राताळी यासारख्या गावात गोद्रीमुक्त मोहिमेला हरताळ फासण्यात आला आहे.