शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

खामगाव शहरात धावताहेत खटारा ऑटो!

By admin | Updated: July 29, 2014 23:40 IST

हेडलाईट, नंबर प्लेट, इंडिकेटर आणि साईड मिररकडेही दुर्लक्ष

खामगाव : मोटार वाहन कायद्यानुसार वाहनाला हेडलाईट, नंबरप्लेट, साईड इंडिकेटर या सोबतच साईड मिरर असणे बंधनकारक आहे. मात्र, शहरात मोटार वाहन कायद्याची ऐशीतेशी करीत शेकडो 'खटारा' ऑटो रस्त्यावर धावत असल्याची बाब ह्यलोकमतह्णने केलेल्या सर्व्हेक्षणातून समोर आली आहे. मोटार वाहन कायद्यानुसार पेट्रोल, डिझेल आणि इतर इंधनावर धावणार्‍या दुचाकी, तिनचाकी आणि चारचाकी वाहनांना हेडलाईट, नंबरप्लेट, साईड इंडिकेटर यासोबतच साईड मिरर असणे बंधणकारक आहे. मात्र, कायद्याचे भय नसल्यामुळे ऑटो चालकांचा बेशिस्तपणा वाढत असल्याचे चित्र आहे. पोलिस, वाहतूक पोलिस वाहन पकडल्यानंतर 'सेटींग' करून सोडतात. त्यामुळे अनेकजण खटारा वाहनही रस्त्यावर चालविण्याचे धाडस करीत असल्याचेही लोकमतच्या पाहणीत दिसून आले. हेडलाईट, साईड मिरर नसल्यामुळे रात्रीच्यावेळी रस्त्यावर एखादी दुर्घटना घडल्यास त्यांचे गंभीर परिणाम रस्त्याने जाणार्‍या इतर नागरिकांनादेखील भोगावे लागू शकतात. त्यामुळे वैयक्तिक निर्णय घेताना त्याचे परिणाम सार्वजनिक तर ठरणार नाहीत ना, याची प्रत्येकाला जाणीव असणे गरजेचे आहे. अलिकडच्या काळात शहरातील रस्त्यांवर दुर्घटनांचे प्रमाण लक्षात घेवून 'लोकमत'ने शहरातील ऑटो चालकांना याबाबत काही प्रश्न विचारलेत. नागरिकांच्या आणि वाहतूक पोलिसांच्या नजरेतून अंत्यत क्षुल्लक असलेल्या या बाबींचा ऊहापोह केल्यानंतर काही निष्कर्ष समोर आलेत. काहींनी आपण दिवसा ऑटो चालवितो. रात्री चालवित नाही. त्यामुळे हेड लाईटची आवश्यकताच काय?, असा प्रतिप्रश्न केला. नंबर प्लेट बाबत अनेकांनी आपली चूक असल्याची कबुली दिली. मात्र, काही ऑटोचालकांनी पोलिसांच्या खाबुगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. अल्प रक्कमेत वाहतूक पोलिस वाहन सोडत असल्यामुळे आपण नंबर प्लेट लावली नसल्याचेही एका ऑटो चालकाने सांगितले. साईड मिरर लावणे आवश्यक आहे. मात्र, या मिररची चोरी होत असल्यामुळे आपण लावले नसल्याचेही एका ऑटो चालकाने सांगितले. इंडिकेटर तुटल्यानंतर पुन्हा बसविणे परवडण्यासारखे नसतात. तुटलेल्या इंडिकेटरकडे जाणून-बूजून दुर्लक्ष करणार्‍यांचेही प्रमाण जास्त आहे. नियमांच्या विरोधात जाणार्‍या या सर्व बाबींकडे वाहतूक पोलिसांकडून दुर्लक्ष केल्या जाते. यामुळे एखादी मोठी दुर्घटना घडू शकते, असा पुसटसा विचारही त्यांच्या मनात येत नाही, हे येथे उल्लेखनिय!

** असे केले सर्वेक्षण

शहरातील मुख्य रस्त्यावर धावणार्‍या ऑटोची गर्दीच्यावेळी आणि कमी गर्दीच्यावेळी पाहणी करण्यात आली. तीन टप्यात हे सर्व्हेक्षण करण्यात आले. या सर्व्हेक्षणात ६८८ ऑटोची पाहणी करण्यात आली. हेड लाईड नसलेले ऑटो- ४४, उजवे साईड इंडिकेटर नाही- २७, डावे साईड इंडिकेटर नाही-३४, दोन्ही साईड इंडिेकेटर नाही- ४६, समोर नंबर प्लेट नसलेले ऑटो- ६९, मागे नंबर प्लेट नसलेले ऑटो- २३. दोन्ही नंबर प्लेट नसलेले ऑटो- ३२, साईड मिरर नसलेले ऑटो- ७४, काच तुटलेले ऑटो- १४.