शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेंच्या शिवसेनेचे तीन उमेदवार जाहीर होणार, रवींद्र वायकरांसह ही चार नावं चर्चेत
2
पतंजलीला मोठा झटका, दृष्टी आय ड्रॉपसह 14 प्रोडक्ट्सवर बंदी, जाणून घ्या कारण
3
 ‘अमित शाह माझं पार्थिव उचलण्यास आले, तर खूप बरं होईल…’ दिग्विजय सिंह यांचं विधान चर्चेत  
4
गोवंडीत महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; अज्ञातांवर गुन्हा
5
धक्कादायक! कोरोनावरील या लसीमुळे होऊ शकतात साईड इफेक्ट्स, कंपनीने स्वत:च दिली कबुली    
6
Kalpana Soren Net Worth : कल्पना सोरेन आहेत करोडपती; पतीपेक्षा चारपट जास्त संपत्ती, जाणून घ्या...
7
'पीके'मध्ये आमिर खाननं खरोखर दिले होते न्यूड सीन, अभिनेता म्हणाला - "जे गार्ड घातलं होतं ते पण..."
8
कार्यकर्तेच ठरविणार विजयाचा गुलाल...! शाहू छत्रपती आणि मंडलिक लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष
9
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
10
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
11
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
12
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
13
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
14
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
15
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
16
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
17
१८% ‘कलंकित’; २९% कोट्यधीश; तिसऱ्या टप्प्यातील १,३५२ उमेदवारांकडे आहे ५.७७ कोटींची सरासरी संपत्ती
18
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
19
राजन विचारे यांच्या मालमत्तेत ११ कोटींची वाढ; रत्नागिरी जिल्ह्यात शेतजमीन
20
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून

पुस्तकांच्या ऑनलाइन विश्वातही साहित्याचा ठेवा! ई-बुकचा वाढतोय प्रभाव

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2019 8:14 PM

ई-बुक वाचण्याकडेही आता अनेकांचा कल वाढला आहे. प्रत्येकाकडे सध्या मोबाईल असल्यामुळे अनेक जण त्याचा वाचणासाठी वापर करत आहे.

बुलडाणा - ई-बुक वाचण्याकडेही आता अनेकांचा कल वाढला आहे. प्रत्येकाकडे सध्या मोबाईल असल्यामुळे अनेक जण त्याचा वाचणासाठी वापर करत आहे. वेगवेळी पुस्तके तथा प्रिंट आवृत्त्या नसलेल्या जुन्या कसदार कादंब-या वाचण्याकडे प्रामुख्याने हा कल दिसून येत आहे. पुस्तकांच्या आॅनलाइन विश्वातही साहित्याचा ठेवा चांगल्याप्रकरणे जपण्याचा प्रयत्न होत आहे. पुस्तकांची घटलेली मागणी लक्षात घेता वाचन संस्कृती धोक्यात आल्याचे बोलल्या जात आहे. इंटरनेटचे जाळे खेड्यापाड्यापर्यंत पोहले असल्याने प्रत्येक जण मोबाईलमध्येच व्यस्त दिसून येत आहे. वाचनाचा ट्रेंड बदलल्यामुळे हातात पुस्तक घेऊन दिवसभर वाचन करणारे वाचक आता अगदी बोटावर मोजण्याइतकेच राहिले आहे. तसेच गं्रथालयात जावून कादंबºया वाचन करणे, मार्केटमध्ये नवीन पुस्तक येताच त्याची खरेदी करणे, हे प्रकार सध्या दुर्मीळ झाले आहेत. सर्व काही मोबाईलमध्ये आॅनलाइन उपलब्ध होत असल्याने पुस्तक विश्वही यात मागे राहिले नाही. वेगवेळ्या प्रकारचे पुस्तक, कथा, जुन्या कसदार कादंबºया आॅनलाइन उपलब्ध आहेत. कविता संग्रह, मराठीतील लेख, लहान मुलांसाठी गोष्टींची पुस्तके सर्वकाही आॅनलाइन उपलब्ध आहे. दरम्यान, याचा वापर मोबाईलवेडे चांगल्या प्रकारे करू शकतात.ऑनलाइन साहित्यपुस्तकांच्या विश्वात डोकावले असता आॅनलाइनवर पुस्तकांची यादी दिवंसेदिवस वाढतच असल्याचे दिसून येते. कथा, कादंबरी, इतिहास, नाटक, भावबंध, वैचारिक, चरित्र, प्रवासवर्णन, दुर्ग दुर्घट भारी, विनोद, इत्यर्थ, कला, काव्य संग्रह, गझल, त्रिवेणी, बाल गोष्टी, बालगाणी, धार्मिक, ज्ञानेश्वरी, संगीत, संस्कृत, पाककला, खेळ, कृषी, मूर्ती कला, चित्रकला अशा वेगवेळ्या प्रकारातील पुस्तके सध्या आॅनलाइनवर आपल्याला वाचायला मिळातात.  राज्य साहित्य आणि सांस्कृतीक मंडळ ऑनलाइनमहाराष्ट्राची भाषा,  संस्कृती, साहित्य आणि इतिहास तसेच विज्ञान, आधुनिक तंत्रज्ञान, समाजविद्या यांच्या कक्षेत येणाºया विषयांवर मराठीमध्ये ग्रंथरचना करणे हे महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे मुख्य उद्दिष्ट आहे. आधुनिक महाराष्ट्राच्या वाग्मयीन गरजा लक्षात घेऊन सुरूवातीपासूनच मंडळ मौलिक व बहुविध वाग्मयीन निर्मितीसाठी कार्यरत आहे. ज्ञान आणि संस्कृतीच्या विकासासाठी साधन स्वरूप व आधुनिक विज्ञान व तंत्रज्ञान यातील अद्ययावत प्रगतीची माहिती देणारी, मूलभूत ज्ञान देणारी पुस्तके व अभिजात ग्रंथ वाचकांना उपलब्ध करून देण्यावर मंडळाने लक्ष केंद्रित केले आहे. या अनुषंगानेच मंडळाच्या वतीने ४४४ पुस्तके ई-बुक स्वरूपात वाचकांना उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत.  ई-बूकला पुनर्मुद्रीत करण्यास निर्बंधमहाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या संकेतस्थळावरील सर्व माहिती, स्कॅन करून मोफत डाऊनलोडकरिता उपलब्ध करून देण्यात आलेली  आहेत. मंडळाच्या संकेतस्थळावरील माहिती, सर्व ई-बूक व स्कॅन करून उपलब्ध करून देण्यात आलेली सर्व पुस्तके व त्यातील मजकूर मंडळाच्या लेखी परवानगीशिवाय कोणत्याही कारणासाठी पुनर्मुद्रीत अथवा प्रकाशित करता येणार नाही किंवा त्याचा वापर करता येणार नसल्याचीही मंडळाकडून सक्त ताकीद देण्यात आलेली आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाMaharashtraमहाराष्ट्र