शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
2
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
3
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
4
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
5
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
6
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
7
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
8
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
9
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
10
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
11
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
12
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
13
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
14
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
15
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
16
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
17
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
18
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
19
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
20
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
Daily Top 2Weekly Top 5

अडीचशे ग्राहकांना मिळाला न्याय

By admin | Updated: September 17, 2015 23:53 IST

बुलडाणा जिल्ह्यातून तीन वर्षांत ग्राहक मंचकडे ४00 तक्रारी.

बुलडाणा: दैनंदिन जीवनात वस्तू वा सेवा खरेदी करताना ग्राहकांची फसवणूक झाल्यास न्याय मिळवून देण्यासाठी ग्राहक न्याय मंचची स्थापना करण्यात आली आहे. तथापि, ग्राहक मंचकडे न्याय मागणार्‍यांची संख्या अत्यल्प आहे. गेल्या तीन वर्षांत जिल्हा ग्राहक न्याय मंचाकडे केवळ ४00 तक्रारी दाखल झाल्या. यातून २४२ ग्राहकांना न्याय मिळाला. बाजारातून वस्तू वा सेवा घेत असताना बरेचदा ग्राहकांना फसव्या जाहिराती, जास्त किमती, निकृष्ट दर्जा तसेच अकार्यक्षम सेवा यामुळे आर्थिक नुकसान व मनस्ताप सोसावा लागतो. ही पिळवणूक टाळण्यासाठी तक्रारी, अडीअडचणी योग्य त्या ठिकाणी मांडल्या पाहिजेत. वैयक्तिक पातळीवर न्याय मिळावा, या उद्देशातून बुलडाणा जिल्ह्यात १९९0 मध्ये जिल्हा ग्राहक न्याय मंचाची स्थापना करण्यात आली. जिल्ह्याची लोकसंख्या १0 लाखांच्या वर आहे. प्रत्येक माणूस दररोज छोटी-मोठी वस्तू खरेदी करतोच आणि या खरेदीमध्ये ५0 टक्क्य़ांपेक्षा जास्त ग्राहकांची फसवणूक होत असते. तरीदेखील जिल्ह्यातील ग्राहक आपल्या हक्कासाठी तक्रार करण्यास पुढे येत नाहीत, हे स्पष्टच आहे.