शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
5
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
6
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
7
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
8
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
9
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
10
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
11
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
12
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
13
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
14
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
15
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
16
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
17
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
18
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
19
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
20
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
Daily Top 2Weekly Top 5

बनावट कागदपत्रांच्या आधारे नोकरी

By admin | Updated: September 21, 2014 00:38 IST

खामगाव येथे माहितीचा अधिकार कायद्यांतर्गत झाले उघड.

खामगाव (बुलडाणा): बनावट शैक्षणिक कागदपत्रांच्या आधारे शासकीय नोकरी बळकावल्याचा प्रकार माहिती अधिकारात मागितलेल्या माहितीच्या आधारे उघड झाला आहे. त्यामुळे शासनाची अशी फसवणूक करणार्‍यावर कारवाई करावी; तसेच पगारापोटी मिळालेली रक्कम वसूल करावी, अशी मागणी शालिकराम जगराम चव्हाण चिंचखेड बंड यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली आहे. जिल्हा परिषद आरोग्य विभाग अंतर्गत विविध ठिकाणी असलेल्या शासकीय रुग्णालयात पदभरतीबाबत जाहिरात देण्यात आलेली होती. यामध्ये चपराशी पदासाठी चवथा वर्ग उत्तीर्ण असणार्‍यांना मुलाखतीसाठी बोलाविण्यात आलेले होते. पदभरतीमध्ये मुलाखतीनंतर सुपडा गुलाब पवार कवडगाव ता. खामगाव यांची नियुक्ती परिचर या पदावर करण्यात आली असून, सध्या सुपडा पवार हे प्राथमिक आरोग्य केंद्र रोहणा येथे परिचर पदावर कार्यरत आहेत. पदभरतीवेळी सुपडा पवार यांनी मराठी प्राथमिक शाळा ढोरपगाव येथील १२१६ क्रमांकाचा शाळा सोडल्याचा दाखला जोडला होता. त्या दाखल्यावर ६ वा वर्ग उत्तीर्ण असे नमूद आहे; मात्र जोडलेला दाखला हा बनावट व खोटा तयार करून त्या खोट्या दाखल्याच्या आधारे त्यांनी चपराशी पदाची नोकरी मिळविली आहे. शाळा सोडल्याचा दाखला हा रजिष्टर नं.१२१६ पा.क्र.४५ जा.क्र.२३२, २ मे १९७९ मराठी पूर्व माध्यमिक शाळा ढोरपगाव असा दिलेला असून, या नंबरचा दाखला हा दुसर्‍याच विद्यार्थ्याचा असल्याचे उघड झाले आहे. तर सुपडा पवार यांची शैक्षणिक पात्रता तिसरा वर्ग एवढीच आहे; परंतु त्यांनी खोट्या कागदपत्राच्या आधारे नोकरी मिळविण्यासाठी शाळा सोडल्याचा खोटा दाखला तयार करून त्याद्वारे नोकरी मिळविली आहे. यासंबंधीचे शाळेचे मूळ दस्तऐवज मुख्याध्यापक यांच्याकडे असून, त्यासंबंधी माहिती व दाखला मागितला असता जाणीवपूर्वक देण्यास टाळाटाळ करीत आहेत. तेव्हा मुख्याध्यापक ढोरपगाव यांच्याकडून मूळ दाखल खारीज रजिष्टर बोलावून शहानिशा करावी, अशी मागणी शालिकराम चव्हाण यांनी केली आहे.