जननी सुरक्षा योजनेचे अनुदान रखडले!

By Admin | Updated: May 1, 2017 01:41 IST2017-05-01T01:41:40+5:302017-05-01T01:41:40+5:30

नांद्रा- जननी सुरक्षा योजने अंतर्गत सात दिवसात दिले जाणारे अनुदान दोन ते तीन वषार्नंतरही मिळाले नसल्याने वंचित महिलांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे याबाबतची तक्रार केली आहे.

Janani Suraksha Yojana grants subsidy! | जननी सुरक्षा योजनेचे अनुदान रखडले!

जननी सुरक्षा योजनेचे अनुदान रखडले!

जि.प. अध्यक्षांकडे तक्रार : अधिकाऱ्यांचे होते दुर्लक्ष

नांद्रा : लोणार तालुक्यातील आरोग्य विभागाच्या भोंगळ कारभारामुळे जननी सुरक्षा योजने अंतर्गत सात दिवसात दिले जाणारे अनुदान दोन ते तीन वषार्नंतरही मिळाले नसल्याने वंचित महिलांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे याबाबतची तक्रार केली आहे. जिल्हापरिषद अध्यक्ष यांना प्रत्येक वंचित महिला पत्र पाठविणार असुन जननी सुरक्षेचा लाभ त्वरित मिळावा व या कामात हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाइ करावी, अशी मागणी होत आहे.
आजचे बालक उद्याचे देशाचे भविष्य आहेत. यामुळे बाळ व त्यांना जन्म देणारी आई दोघे तंदुरूस्त असने आवश्यक असल्याने शासनाने त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यात यावी, या उदद्ेशाने माताना प्रसुतीच्या काळात जननी सुरक्षा योजनेंतर्गत मातृत्व अनुदान म्हणुन दिली जाणारी आर्थिक मदत दोन ते तीन वर्षा नंतरही मिळाली नसल्याने महिलांमध्ये संताप व्यक्त केल्या जात आहे. थकित रक्कम त्वरित मिळावी, यासाठी अनेकवेळा अधिकाऱ्यांकडे मागणी करण्यात आलेली आहे. परंतु झोपेचे सोंग घेतलेल्या आरोग्य विभागाला जाग तरी कसा येणार. यामुळे आता महिलांनीच याबाबत जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार करून व जिल्हापरिषद अध्यक्षा यांना प्रत्येक वंचित महिला पत्र पाठवुन आरोग्य विभागाच्या गलथान कारभार त्यांच्या निदर्शनास आनुन दिला आहे. शासनाकडुन मिळणारीही आर्थिक मदत आवश्यक त्या वेळेत मिळत नसल्याने त्याचा काहीच फायदा होत नसुन त्यासाठी महिलांना वर्षानुवर्षे बँकेचे उंबरठे झिजवावे लागतात व आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
जिल्हापरिषद अध्यक्ष ह्या महिला असल्याने त्यांना हा प्रश्न लवकर मार्गी लागेल, याच उदद्ेशाने या वंचित महिलांनी हा प्रयत्न केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. यावेळी दिव्या कडुजी मोरे, हिना सुनिल भोसले, प्रियंका शेषराव भोसले, पंचशिला जगदिश नरवाडे, भारती परमेश्वर काळे व रूपाली रामदास नरवाडे, स्वप्ना राजेश अंभोरे, यमुना मदन वाणी, संगिता अरूण कांबळे ,पुनम एकनाथ फुपाटे, नांद्रा येथिल अशा प्रत्येक गावातील वंचित महिलांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली आहे व जि.प पत्र पाठविले आहेत.

अधिकारी करतात मनमानी कारभार
गरिबीमुळे प्रसुत काळात आवश्यक तो आहार व आराम मिळत नसल्याने बालक व माता दोघे ही विविध आजाराचे शिकार होतात. मागील महिण्यात याच अनुदानासाठी महिलांनी तत्कालीन जिल्हापरिषद अध्यक्षा अलकाताई खंडारे यांची भेट घेवून जननी सुरक्षेचे अनुदान मिळत नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून दिले होते. तेव्हा त्यांनी आरोग्य अधिकाऱ्यांची चांगलीच कान उघडनी केली आणि त्याच दिवशी अनुदान खात्यात जमा झाले. यावरून आरोग्य विभागाचे अधिकारीच मनमानी करून त्रास देतात हे स्पष्ट होते.

Web Title: Janani Suraksha Yojana grants subsidy!