जळगावात अतिक्रमण हटाव मोहीम

By Admin | Updated: May 28, 2014 00:07 IST2014-05-28T00:07:33+5:302014-05-28T00:07:33+5:30

जळगावात अतिक्रमण हटाव मोहीमेला अतिक्रमणधारकांनी स्वत: प्रतिसाद दिल्याने रस्ते मोकळे झाले.

Jalgaon encroachment removal campaign | जळगावात अतिक्रमण हटाव मोहीम

जळगावात अतिक्रमण हटाव मोहीम

जळगाव जामोद : नगरात अतिक्रमण हटाव मोहीमेला अतिक्रमणधारकांनी स्वत: प्रतिसाद दिल्याने रस्ते मोकळे झाले. रस्त्याच्या कडेला असलेली दुकाने वाहतुकीकरीता अडथळा निर्माण करीत असल्याने ती रस्त्यापाठ दहा फुट मागे घेण्यात आली. यावेळी कोणताही तणाव जाणवला नाही. आ.डॉ.संजय कुटे व सेनेचे जिल्हाप्रमुख दत्ताभाऊ पाटील हे जातीने यावेळी हजर होते. डॉ.आंबेडकर शाळेसमोरील तसेच नांदुरा रस्त्यावरील अतिक्रमीत दुकाने व नवीन बसस्थानकावरील दुकाने रस्त्यापासून दहा फुट मागे घेण्यात आली. नगरात सध्या वाहतुकीला अडथळा होवू नये एवढी भुमिका घेत अतिक्रमण हटविण्यात आले. जेव्हा विकासाची कामे किंवा रस्ता रूंदीकरण होईल. तेव्हा ही अतिक्रमण दुकाने पुर्णपणे हटविण्यात येतील, असे सांगण्यात आले. त्यामुळे नगर पालिकेची नाक्याची खोली वगळता अन्य कोणत्याही दुकानावर बुलडोजर चालला नाही. सर्व समोपचाराने झाल्याने तणाव नव्हता. यावेळी तहसिलदार चव्हाण, बांधकाम विभागाचे उपविभागीय अधिकारी ढोकणे, मुख्याधिकारी राठी, ठाणेदार भोगे यांचेसह सर्व प्रशासकीय अधिकारी व पोलीसांची उपस्थिती होती.

Web Title: Jalgaon encroachment removal campaign