शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
2
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
3
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
4
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
5
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
6
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
7
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
8
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
9
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
10
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
11
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
12
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
13
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
14
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
15
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
16
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
17
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
18
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
19
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
20
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

सिंदखेडराजा तालुक्यातील माल जालना जिल्ह्यात

By admin | Updated: March 24, 2017 01:30 IST

शेतक-यांची घालमेल; नाफेड केंद्रावर लागतात तुरीच्या वाहनांच्या रांगा सिंदखेडराजा कृषी उत्पन्न बाजार.

अशोक इंगळे सिंदखेडराजा, दि. २३- सिंदखेडराजा कृषी उत्पन्न बाजार समितीपेक्षा इतर शहरात मालाला अधिक भाव मिळत असल्याने शेतकर्‍यांचा कल मोठय़ा बाजार समितीत जास्त आहे. केवळ नाफेड केंद्रावरच तुरीच्या वाहनांच्या रांगा लागत असून, इतर शेतमाल जालना जिल्ह्यात जात आहे. तालुक्यात कृषी उत्पन्न बाजार समितीमार्फत साखरखेर्डा, दुसरबीड आणि सिंदखेडराजा येथे कृषी मालाची खरेदी चालते. साखरखेर्डा, शेंदुर्जन, मलकापूर पांग्रा परिसरातील शेतकरी खामगाव आणि चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतमाल नेवून विकतात. तर दुसरबीड, किनगावराजा, सिंदखेडराजा परिसरातील शेतकरी जालना आणि देऊळगावराजा कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतमाल नेवून विकत आहेत. सोयाबीन हे मुख्य पीक असून, आर्थिक टंचाईमुळे आजही सोयाबीन शेतकर्‍यांच्या घरातच आहे. बाजार समितीत सोयाबीनला तीन हजार रुपयापेक्षा जास्त भाव नाही. तुरीला बाजार समितीत भाव नसल्याने नाफेड खरेदी केंद्रावर मोठय़ा प्रमाणात आवक वाढली आहे. सिंदखेडराजा केंद्रावर आज १00 हून अधिक वाहने उभी आहेत. कोठेच नगदी रक्कम मिळत नसल्याने शेतकर्‍यांना वाहन खर्च स्वत:च्या खिशातून द्यावा लागतो. सध्या हरभरा, गहू, ज्वारी ही पीकेही शेतकर्‍यांच्या घरात आली आहेत. हरभरा धान्याला प्रतिक्विंटल ४ हजार ते ४ हजार २५0 रुपयेपर्यंत भाव मिळत आहे. गव्हाची आवक कमी असली, तरी भाव मात्र प्रतिक्विंटल १ हजार ८00 रुपयांपर्यंत मिळत आहे; मात्र शेतमाल विक्रीनंतर नगदी पैसे मिळत नाहीत. सर्व रक्कम बँक खात्यात जमा होऊन नंतर शेतकर्‍यांना ती रक्कम काढता येते; परंतु बँकेत चार ते पाच हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम मिळत नाही. सिंदखेडराजा कृषी उत्पन्न बाजार समितीत सिंदखेडराजा येथे २00 ते २५0 पोत्यांची आवक असून, साखरखेर्डा येथे १५ ते २0, दुसरबीड येथे ५0 ते ७५ पेक्षा जास्त आवक नाही. त्यामुळे येथे व्यापारी थांबायला तयार नाहीत. खामगाव, जालना, देऊळगावराजा, चिखली या शहरात शेतमालाला भाव चांगला मिळतो. ही तफावत मोठय़ा प्रमाणात असल्याने तालुक्यातील सर्वच बाजार समितीचे उपबाजार शेवटची घटका मोजत आहेत.