शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
2
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
3
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
4
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
5
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
6
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
7
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
8
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
9
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
10
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
11
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
12
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
13
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
14
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
15
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
16
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
17
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
18
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
19
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
20
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णालयातच मिळते आजाराला आमंत्रण

By admin | Updated: November 8, 2014 23:43 IST

बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात घाणीचे साम्राज्य, कंत्राटदाराचेही होते स्वच्छतेकडे दुर्लक्ष.

बुलडाणा : आजारावर योग्य उपचार व्हावा व कमी खर्चात आरोग्याच्या सर्व सुविधा मिळाव्यात यासाठी जिल्हाभरातून बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी रुग्ण येतात. मात्र आलेल्या रुग्णाचे आजार बरा होण्याऐवजी येथील अस्वच्छतेमूळे रुग्णांना विविध आजाराला सामोरे जावे लागत आहे. कोट्यावधी रुपये खर्च करून बुलडाणा येथे जिल्हा सामान्य रुग्णालयाची ईमारत उभारण्यात आली. तर अत्याधूनिक सुविधांनी युक्त असे रुग्णालय करण्यात आले आहे. जिल्हाभरातून येथे विविध आजारावर उपचार घेण्यासाठी रूग्ण येतात. मात्र आलेले रूग्ण व त्यांच्या नातेवाईकांना येथील गलीच्छ परिसर व घाणीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे आजार कमी होण्याऐवजी तो वाढत आहे. महिला, पुरूष, लहान मुले या बरोबरच सर्जरी वार्ड, अतिदक्षता विभाग, बर्न वार्ड असे विविध स्वतंत्र वार्ड आहेत. या वार्डामध्ये किमान दिवसातून चारवेळा झाडू मारून हे वार्ड निर्जंतूक करावे असा नियम सांगतो. मात्र रूग्ण भरती असलेल्या या वार्डामध्ये सकाळी व संध्याकाळी असे दोनच वेळा वार्डाची सफाई केल्या जाते. वार्डातील शौच्यालयात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरलेले असते. यातच जंतुंचा संसग्र होऊन रोगाला आमंत्रण मिळते. सध्या देशभरात डेंग्यु सारख्या महाभयंकर रोगाचा प्रादुर्भाव वाढला असताना रुग्णालय प्रशासनाला काहीही सोयर सुतक नाही. जेथे आरोग्याची हमी दिल्या जाते तेथेच रोगाला निमंत्रण मिळत असल्याने रूग्णांनी जावे तरी कोठे असा प्रश्न उपस्थित होत आहे.