शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
2
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
3
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
4
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
5
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
6
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
7
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
8
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
9
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
10
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
11
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
12
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
13
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
14
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
15
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
16
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
17
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
18
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
19
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
20
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
Daily Top 2Weekly Top 5

साखरखेर्डा प्राथमिक आरोग्य केंद्रात २५० शिक्षकांची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:33 IST

साखरखेर्डा : कोरोना विषाणू संक्रमणानंतर २७ जानेवारीपासून शाळा सुरू होणार आहेत. त्याअनुषंगाने साखरखेर्डा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात २५० शिक्षकांची ...

साखरखेर्डा : कोरोना विषाणू संक्रमणानंतर २७ जानेवारीपासून शाळा सुरू होणार आहेत. त्याअनुषंगाने साखरखेर्डा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात २५० शिक्षकांची कोरोना तपासणी करण्यात आली. या सर्व शिक्षकांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे.

जिल्हा परिषद आणि माध्यमिक शाळांमधील पाचवी ते आठवीपर्यंतचे वर्ग सुरू करण्याचे आदेश शिक्षण मंत्र्यांनी दिल्यानंतर प्रत्येक शिक्षकांची कोरोना टेस्ट सुरू आहे . साखरखेर्डा प्राथमिक आरोग्य केंद्रात २५० शिक्षकांची कोरोना टेस्ट करण्यात आली. टेस्ट करण्यात आलेल्या सर्व शिक्षकांची तपासणी अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप सुरुशे यांनी दिली . महाराष्ट्र शासनाने दिवाळीनंतर ९ वी ते १२ वीचे वर्ग सुरू केले होते. वर्ग सुरू करताना पालकांची सहमती आवश्यक ठेवण्यात आली होती. त्यावेळी प्रथम दोन टप्प्यांत वर्ग भरविण्यात आले होते. परंतु सुरुवातीला विद्यार्थ्यांनी प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे तालुक्यातील शाळांमध्ये केवळ १० टक्के उपस्थिती होती. त्यानंतर मात्र उपस्थिती वाढली.

चौकट...

कोरोना उपाययोजनांवर भर!

- सोशल डिस्टनचे अंतर राखून आणि तोंडाला रूमाल किंवा मास्क लावून विद्यार्थी आले. शाळांमध्ये सॅनिटायझरचा वापर करण्यात आला. दररोज तपासणी करण्यात आली. साखरखेर्डा, शेंदुर्जन, मलकापूर-पांग्रा येथील शाळेत एकही विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आढळला नाही. शिक्षक आणि संस्थाचालक यांनी घेतलेली खबरदारी उपयोगी आली. तोच धागा धरून पाचवी ते आठवीपर्यंतच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

चौकट..

२२ गावांतील २५० शिक्षकांची टेस्ट

तालुक्यातील प्रथम पाचवी ते आठवीपर्यंत शिकवीणीचे कार्य करणाऱ्या जिल्हा परिषद, उच्च प्राथमिक शाळा आणि माध्यमिक शाळांमधील साखरखेर्डा प्राथमिक आरोग्य केंद्रात अंतर्गत असलेल्या साखरखेर्डा, सवडद, मोहाडी, राताळी, तांदूळवाडी, दरेगाव, शेंदुर्जन, शिंदी, पिंपळगा- सोनारा, सावंगी भगत, गुंज, वरोडी, राजेगाव, सायाळा, लिंगा, जागदरी, जनुना तांडा, बाळसमुद्र, गोरेगाव, उमनगाव, पांग्रीकाटे, राताळी या २२ गावांतील २५० शिक्षकांची कोरोना टेस्ट करण्यात आली. या स्पेसमध्ये सर्व शिक्षक निगेटिव्ह आले आहेत.

कोट...

सर्व शिक्षक निगेटिव्ह आले असले तरी, पालकांनी आपल्या मुलांना शाळेत पाठविताना खबरदारी म्हणून तोंडाला रुमाल किंवा मास्क लावून शाळेत पाठवावे. कोरोना संसर्गजन्य आजार कमी झाला असला, तरी भीती कायम आहे.

डॉ. संदीप सुरुशे, वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र, साखरखेर्डा

-------