शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची झाडाझडती

By admin | Updated: December 24, 2014 00:16 IST

विद्यार्थ्यांच्या तक्रारीवरून चौकशी : वरिष्ठांना अहवाल सादर करणार.

मोताळा (बुलडाणा): येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा भोंगळ कारभार प्रशिक्षक विद्यार्थ्यांनी चव्हाट्यावर आणल्यानंतर २३ डिसेंबर रोजी जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी कुकडे यांनी संस्थेच्या कारभाराची प्रत्यक्ष पाहणी केली. पाहणी दरम्यान कुकडे यांनी संपूर्ण प्रकरणाचा आढावा घेऊन सविस्तर अहवाल तयार केला व हा अहवाल वरिष्ठ स्तरावर सादर करणार असल्याचे त्यांनी सांगितले.येथील औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात दोनशेच्यावर विद्यार्थी शिक्षण घेत असून, मागील काही महिन्यांपासून कर्मचारी, प्रशिक्षक यांच्या मनमानी कारभाराला प्रशिक्षक विद्यार्थी कंटाळले होते. काही महिन्यांपासून नियमित शिक्षकांची अपुरी संख्या, पिण्याच्या पाण्याची गैरसोय, प्राचार्यांची अनियमितता, संगणक ऑपरेटरची बदली, साफसफाईकडे कमालीचे होत असलेल्या दुर्लक्षामुळे विद्यार्थ्यांच्या अडचणींमध्ये आणखीच भर पडली गेली. त्यात ग्रंथालय कक्षासह कुलूप बंद वर्गखोलीमुळे विद्यार्थ्यांना झाडाखाली बसण्याची वेळ आली, त्यामुळे त्रस्त झालेल्या विद्यार्थ्यांनी संस्थेतील कर्मचार्‍यांचा कारभार चव्हाट्यावर आणत २२ डिसेंबर रोजी संस्थेमध्ये गोंधळ घातला होता. या गंभीर बाबीची दखल घेत जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी कुकडे यांनी २३ डिसेंबर रोजी संस्थेची पाहणी केली. यावेळी मागील १0 दिवसांपासून सील असलेला कोपा रूमचे सील तोडून वर्ग उघडण्यात आला. साफसफाई कर्मचारी व शिक्षकांची रिक्त पदांची माहिती घेऊन संस्थेचा परिसर साफ करून घेतला. पाहणी दरम्यान संस्थेचे प्राचार्य रजेवर असल्याचे आढळले. दरम्यान, पाहणीचा अहवाल वरिष्ठ स्तरावर सादर करणार असल्याचे कुकडे यांनी सांगितले.