शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
3
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
4
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
5
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
6
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
7
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
8
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
9
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
10
६ मिनिटं वाचन केल्याने ६८% नी मानसिक तणाव कमी होतो, पण वाचनाची आवड लावायची कशी?
11
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
12
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
13
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
14
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
15
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
16
सांगली हादरली! पत्नीला घरात ठेवण्याच्या हट्टापायी आईची हत्या; वडील घरी नसताना मुलाचे क्रूर कृत्य
17
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
18
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
19
कोण आहे सीताराम बाबा? ज्यांनी भाजपा आमदाराला जोरजोरात ठोसे मारले अन् ढकलून दिलं, Video व्हायरल
20
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
Daily Top 2Weekly Top 5

परतीच्या पावसामुळे जलसाठय़ात वाढ!

By admin | Updated: October 3, 2016 02:46 IST

खामगाव तालुक्यातील रब्बी पिकांसाठी वाढता जलसाठा उपयुक्त.

खामगाव (जि. बुलडाणा), दि. २- गेल्या आठवड्यापासून परतीच्या पावसाने दमदार पुनरागमन केल्याने जलसाठय़ात अपेक्षित वाढ झाली आहे. वाढत्या जलसाठा रब्बी हंगामासाठी उपयुक्त ठरणार असून, सिंचन क्षेत्रामध्ये नक्कीच वाढ होईल. परतीचा पाऊस असाच तालुक्यातील काही दिवस कायम राहिल्यास यावर्षी सर्वच प्रकल्प तुडुंब होण्याची शक्यता वाढली आहे.यावर्षीचा पावसाळा जूनपासून समाधानकारक राहिला. ऑगस्ट महिन्यातील दडी वगळता पावसाने यंदा चांगली साथ दिली आहे. दमदार पावसाच्या आगमनाने मागील तीन वर्षात प्रथमच जुलै महिन्यात नदी-नाले दुथडी भरुन वाहले. खरीप हंगामातील पिकेही जोमाने बाहेर निघाली. मूग, उडिदाचे उत्पादन चांगल्यापैकी असून, पावसाच्या दडीचा सोयाबीन पिकाला फटका बसला आहे. पावसाच्या दडीमुळे शेतकरी चिंताग्रस्त बनले होते. तर तालुक्यातील धरणातील जलसाठय़ाची वाढ थांबली होती. मागील पंधरा दिवसाअगोदर तालुक्यातील मन प्रकल्पात ६७ टक्के जलसाठा होता. तर तोरणा प्रकल्पात ३८ टक्के, ढोरपगाव ८७ टक्के व ज्ञानगंगा प्रकल्पात ४४ टक्के जलसाठा होता. केवळ मस प्रकल्प ओव्हर फ्लो झाला होता. मात्र मागील आठवड्यात परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावली. यामुळे आठवडाभरातच जलसाठय़ात अ पेक्षित वाढ झाली आहे. मन प्रकल्पात सद्यस्थितीत ८२ टक्के जलसाठा झाला आहे. या परिसरात आतापर्यंत ६३0 मि.मी. पावसाची नोंद आहे. तोरणा प्रकल्पात ६२५ मि.मी. पाऊस होऊन जलसाठा ४६.७८ टक्के आहे. ढोरपगाव प्रकल्प १00 टक्के भरला असून, सध्या या प्रकल्पातून ५ सेमी पाण्याचा विसर्ग सुरु आहे. खामगाव शहराला पाणी पुरवठा करण्याच्या ज्ञानगंगा प्रकल्पात घसघशीत वाढ होऊन जलसाठा ५८.0६ टक्के झाला आहे. या परिसरात आतापर्यंत तालुक्यात सर्वाधिक कमी ३३0 मि.मी. पावसाची नोंद आहे. लघुप्रकल्प बोरजवळामध्ये ५१.६0 टक्के, गारडगाव ८३.८३ टक्के, लांजुड ६८.२९ टक्के, पिंप्री गवळी ९७.१३ टक्के, तर टाकळी तलावात १00 टक्के साठा होऊन, यामधून २ से.मी. पाण्याचा विसर्ग सुरु आहे. परतीच्या पावसामुळे नदी-नाले पुन्हा दुथडी भरुन वाहू लागले असून, धरणामध्ये जलसाठा लवकरच वाढण्याची शक्य ता आहे.ढोरपगाव मन प्रकल्पांतर्गत नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारापरतीच्या पावसामुळे तालुक्यातील जलसाठय़ात अपेक्षित वाढ होत आहे. शिर्ला नेमाने येथील मन प्रकल्पात सद्यस्थितीत ८२ टक्के जलसाठा झाला असून, परतीचा पाऊस सुरु राहिल्यास धोक्याची पाणीपातळी ओलांडली जाऊ शकते. त्यामुळे सुरक्षितता म्हणून मन नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा पाटबंधारे विभागाच्यावतीने देण्यात आला आहे. तसेच ढोरपगाव लघू प्रकल्प ओव्हर फ्लो होऊन, यामधून पाण्याचा विसर्ग सुरु आहे. या प्रकल्पालगतही सतर्कतेचे इशारे देण्यात आले आहेत.परतीच्या पावसामुळे तालुक्यातील प्रकल्पात अपेक्षित जलसाठा वाढत आहे. सुरक्षितता म्हणून मन प्रकल्प व ढोरपगाव लघू प्रकल्पांतर्गत येणार्‍या धोक्याच्या गावांना सतर्क तेचा इशारा देण्यात आला आहे. धरणातील वाढत्या जलसाठय़ावर विभाग लक्ष ठेवून आहे.- पी.यू. सरदारउपविभागीय अधिकारीमन प्रकल्प उपविभाग, शिर्ला नेमाने