शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
2
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
3
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
4
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
5
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
6
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
7
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
8
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
9
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
10
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
11
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
12
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
13
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
14
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
15
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
16
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
17
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
18
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
19
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
20
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

उत्पादनात वाढ; भाव मात्र घटले!

By admin | Updated: March 24, 2017 01:32 IST

शेतमालाचे दर खालावल्याने शेतकरी आर्थिक विवंचनेत.

नागेश मोहिते धाड (बुलडाणा), दि.२३- खरीप आणि रब्बी हंगामातील पिकांचे यावर्षी बर्‍यापैकी उत्पादन शेतकर्‍यांना मिळाले आहे. मात्र मागील वर्षीच्या तुलनेत शेतमालास भाव मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडले आहेत. सध्या रब्बीचा हंगाम आटोपला असून गहू, हरबरा, मका हय़ा पिकांची सोंगणी व मळणी सुरु आहे. तर या भागातील प्रमुख असणारे पिक सोयाबीनचे भाव वाढतील वाढतील या आशेवर बहुतेक शेतकर्‍यांनी खरीपाचे सोयाबीन विक्री केली नाही, पाऊसमान चांगले राहिल्याने शेतकर्‍यांचे डोक्यावरचे कर्ज, कमी होऊन हाताशी चारपैसे राहतील अशी अपेक्षा असतांना मात्र आजरोजी सोयाबीनचे दर प्रती क्विंटल २७00 रुपये आहे. तर मागील वर्षी हाच दर ३८00 रुपये पर्यंत होता. परिणामी सध्याच ११00 रुपये प्रती क्विंटल नुकसान भावाच्या फरकाचे शेतकर्‍यांना होत आहे. तर खरीपाची मका व रब्बीची मका अशी एकत्रीत रित्या सध्या मळणी हंगाम सुरु आहे. हय़ाच मकाचा दर मागील वर्षी १७00 रुपये होता. तर सध्या १३00 रुपये मकाला दर आहे. परिणामी मकाला ४00 ते ५00 रुपये भावातच नुकसान शेतकर्‍यांना होत आहे. यावर्षी हरबरा पिकास मागील वर्षीपेक्षा चांगले दर आहेत. सध्या ५५00 रुपये प्रती क्विंटलचा दर असल्याने हरबरा पीक लाभकारक ठरले आहे. तर दुर्दैवाने यावर्षी धाड शिवारात हरबरा पिकाची पेरणी अत्यल्प राहिल्याने शेतकर्‍यांना त्याचा लाभ होणार नाही. एकंदरीत उत्पादन बर्‍यापैकी हाती आले तरी मिळणारा दरच शेतकर्‍यांना घातक ठरत आहे. त्यातही शेतकरी आपला माल कृषी उत्पन्न बाजारात विक्रीस घेऊन जात आहे. परंतु व्यापारी वर्ग ह्यएकरकमी पैसाह्ण देण्यात येत नसल्याने शासनाच्या नवीन धोरणामुळे शेतकर्‍यांना चेकच्या स्वरुपात पैसे मिळत आहे. तसेच बॅकेतूनही मोठी रक्कम शेतकर्‍यांना मिळत नसल्याने येथे शेतकर्‍यांची मोठी अडचण निर्माण झाली आहे. एकूणच शेतकरी हय़ा विचित्र परिस्थितीत अडकलेला असून शेतकरी आर्थिक संकाटता सापडला आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना संपूर्ण कर्जमाफीची गरज आहे. शेतमालाला भाव नाही, कर्जाचा डोंगर उभारला आहे. अशा स्थितीत शासनाने शेतकर्‍यास मदत करणे गरजेचे झाले आहे.खरीप आणि रब्बी हंगाम चांगला राहीला डोक्यावरचे कर्ज फिटून हाती पैसा मिळेल अशी आशा होती. परंतु शेतमालाचे भाव मातीमोल झाल्याने हाती काहीच येत नाही.- अरुण जाधवशेतकरी, धाडपावसाचे प्रमाण चांगले राहिल्याने उत्पादन बर्‍यापैकी झाले आहे. मात्र आता शेतमालाचे दर पडल्याने कर्जाची परतफेड कशी करावी? असा प्रश्न निर्माण झाला असून, कर्जमाफी शिवाय पर्याय नाही.- दिलीप वाघशेतकरी, धाड