शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

पेट्रोल डिझेलचे दर वाढल्याने मशागतीचे दर वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:31 IST

धामणगाव परिसरात शेतात नांगरणीसह इतर शेती मशागतीची कामे सुरू झाली आहेत. दुष्काळात तेरावा महिना अशी अवस्था शेतकऱ्यांची झाली आहे. ...

धामणगाव परिसरात शेतात नांगरणीसह इतर शेती मशागतीची कामे सुरू झाली आहेत. दुष्काळात तेरावा महिना अशी अवस्था शेतकऱ्यांची झाली आहे. पेट्रोल, डिझेलच्या सततच्या दरवाढीमुळे शेतकऱ्यांसाठी ट्रॅक्टरच्या साह्याने करावयाची मशागत महागली आहे. ट्रॅक्टरमालकांनी शेती मशागतीचे दर वाढविले आहेत. सध्या शेतात तूर, हरभरा, गहू काढण्याचा हंगाम सुरू आहे. अंदाजे १२० ते १३० रुपये एका कट्यामागे शेतकऱ्यांना द्यावे लागत आहेत. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत. घरगुती गॅस सिलिंडरला ८०० ते ९०० रुपये मोजावे लागत आहेत. गॅसची भाव झाल्याने महिलांमधून ओरड होताना दिसत आहे. पूर्वीच्या काळात पारंपरिक पध्दतीने बैलजोडीने शेतकरी शेतीची मशागत करीत होते. परंतु, आता आधुनिक युगात यंत्र आल्याने शेतीची कामे ट्रॅक्टर मळणीयंत्र, रोटावेटर, हार्वेस्टर याद्वारे होत आहेत. या यंत्रांना पेट्रोल व डिझेलची गरज असते. परंतु, आता डिझेल व पेट्रोलचे दर वाढतच आहेत. त्यामुळे शेती मशागतीच्या कामासाठी वापरले जाणारे ट्रॅक्टर नांगरणीसाठी तासाला सातशे ते आठशे रुपये घेत आहेत. ट्रॅक्टर, मळणीयंत्र, हार्वेस्टर, जेसीबी यांचेही दर वाढले आहेत. सध्या परिसरात ट्रॅक्टरच्या साह्याने नांगरणी केली जात आहे.