शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
2
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
3
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
4
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
5
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
6
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
7
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
8
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
9
'पक्षात एवढा अपमान होत असेल तर मी काँग्रेस सोडेल!', नितीन राऊत यांचा इशारा, विकास ठाकरे यांची प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार
10
वेळेविरुद्धची शर्यत! ५ मिनिटांचा उशीर अन् जाहीर माफी; महिला मंत्र्याचा 'तो' Video तुफान व्हायरल
11
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
12
'या' दोन शब्दांची जादू अनुभवून तर पाहा; मनातले सगळे नकारात्मक विचार क्षणात पळून जातील
13
काव्या मारनच्या SRH ला धक्का; पॅट कमिन्स परतणार अशी चर्चा रंगत असताना 'या' खेळाडूनं सोडली साथ
14
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
15
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
16
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
17
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
18
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
19
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
20
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

जलसंधारणामुळे भूजल पातळीत वाढ

By admin | Updated: December 31, 2014 00:29 IST

बुलडाणा जिल्ह्यात सरासरी एक फूट वाढ : १३ पैकी पाच तालुक्यात घट.

हर्षनंदन वाघ / बुलडाणायावर्षी सरासरी पावसात घट निर्माण झाली असली तरी मागिल वर्षी जलसंधारण व गाळ काढण्याची कामे मोठय़ा प्रमाणात झाल्यामुळे जिल्ह्यात सरासरी भूजल पातळीमध्ये एक फूट वाढ झाली आहे, तर १३ तालुक्यांपैकी पाच तालुक्यात 0.४२ मीटर घट झाल्याचे दिसून येत आहे. विविध प्रकारच्या प्रदूषणात झालेली वाढ, निसर्गाचा वाढलेला असमतोल, मोठय़ा प्रमाणात होत असलेली झाडांची कत्तल, त्यामुळे दरवर्षी पावसाचे प्रमाण कमी होत आहे. यावर्षी जिल्ह्यात सरासरी ३0 टक्के पाऊस कमी झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यात डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला तीव्र पाणीटंचाईची शक्यता वर्तविण्यात आली होती. जिल्हाधिकारी किरण कुरूंदकर व विविध सामाजिक संघटनांच्या सहकार्याने सर्वत्र जलसंधारण व गाळ काढण्याचा कार्यक्रम मोठय़ा प्रमाणात राबविण्यात आला. त्यामुळे पाणीटंचाईची तीव्रता कमी झाली असून, आठ तालुक्यात 0.६६ मीटर वाढ झाल्याचे दिसून येत आहे. याबाबत भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेने जिल्ह्यातील १६७ निरीक्षण विहिरींचे सर्वेक्षण केले. त्यावरून जिल्ह्यातील १३ तालुक्यांपैकी आठ तालुक्यात सरासरी 0.६६ मीटर वाढ झाल्याचे दिसून आले आहे. चिखली तालुक्यात १४ निरीक्षण विहिरींचे सर्वेक्षण करण्यात आले असून, 0.२३ मीटर वाढ दिसून आली. मेहकर तालुक्यात २१ विहिरींचे सर्वेक्षण केले असता 0.५३ मीटर, सिंदखेडराजा तालुक्यात १३ विहिरींचे सर्वेक्षण केले असता 0.५५ मीटर, मलकापूर तालुक्यातील १0 विहिरींचे सर्वेक्षण केले असता 0.७४ मीटर, मोताळा तालुक्यातील १३ विहिरींचे सर्वेक्षण केले असता 0.६९ मीटर, नांदुरा तालुक्यातील १0 विहिरींचे सर्वेक्षण केले असता 0.४८ मीटर, जळगाव जामोद तालुक्यातील सात विहिरींचे सर्वेक्षण केले असता १.३५ मीटर, संग्रामपूर तालुक्यातील १४ विहिरींचे सर्वेक्षण केले असता 0.७४ मीटर अशा प्रकारे आठ तालुक्यात 0.६६ मीटर भूजल पातळीत वाढ झाल्याचे दिसून येत आहे.दरवर्षीपेक्षा यावर्षी जिल्ह्याच्या भूजल पातळीत १ फुट वाढ झाली आहे. मागिल वर्षी जिल्हाधिकारी कुरूंदकर यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आलेले विविध जलसंधारणाची कामे व गाळ काढण्याच्या कामामुळे भूजल पातळीत वाढ झाली असल्याचे , भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेचे वरिष्ठ भूवैज्ञानिक डॉ.व्ही.पी.कथने यांनी सांगीतले.