शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
2
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
3
Top Marathi News LIVE Updates: खरातच्या पत्नीच्या नावे उरणमध्येही २० गुंठे जमीन
4
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
5
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
6
AC सोबत पंखा सुरू ठेवणं फायद्याचं की तोट्याचं? वीज बिल वाचवणारी 'ही' आहे खास ट्रिक
7
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
8
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
9
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
10
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
11
IPL 2026: MI vs CSK सामन्यात MS Dhoni खेळणार? चेन्नईच्या नेट प्रॅक्टिसमधून चित्र झालं स्पष्ट
12
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
13
इराणविरोधातील मोहिमेत मोसादचा महत्वाचा गुप्तहेर 'मेम' मारला गेला; इस्रायलने पहिल्यांदाच दिली कबुली
14
Palmistry: सावधान! तुमच्या राहु पर्वतावर 'क्रॉस' किंवा 'तीळ' तर नाही ना? हस्तशास्त्राचा मोठा इशारा
15
Ola Electric च्या शेअर्समध्ये ६५ टक्क्यांपर्यंत तेजी, अजून वाढ होणार का? काय आहे नवं टार्गेट?
16
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
17
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
18
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
19
लाज आणली रे लाज आणली! हॉटेल कर्मचाऱ्यांनी सुटकेस उघडायला लावली, बालीमध्ये भारतीयांच्या चोरीचा Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

गैरसोयीमुळे विद्यार्थिनींचे हाल

By admin | Updated: September 25, 2014 01:15 IST

सिंदखेडराजा बसस्थानकावर सुविधांचा अभाव.

सिंदखेडराजा : येथील परिवहन महामंडळाच्या आगार प्रशासनाच्या दुर्लक्षतेमुळे विद्यार्थिनींना त्रास सहन करावा लागत आहे. याकडे संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे. सिंदखेडराजा ते भोसा मार्गावर ३५0 पासधारक विद्यार्थीनी असून देखील मानव विकासची एकही बस गाडी नाही. त्यामुळे विद्यार्थीनी व विद्यार्थ्यांना शाळेच्या वेळेवर बसगाडी नसल्यामुळे शिक्षणाचा बट्टयाबोळ झाला आहे. तर सिंदखेडराजा ते गारखेड मार्गावर १८५ पासधारक विद्यार्थीनींचे गाडी अभावी हाल होत आहेत. शनिवारला तर गाडीच नसते, तरी याबाबत बसस्थानकाचेवतीने वरिष्ठांना अनेकवेळा पत्रव्यवहार केले. सिंदखेडराजा बसस्थानकावरुन दररोज लांब पल्ल्याच्या नागपूर, मुंबई, गडचिरोली, पुणे, सातारा, ठाणे, पंढरपूर अशा २३0 बसगाड्या १२ तासामध्ये जाणेयेणे करतात. तर मेहकर आगाराच्या फक्त ५ बस गाड्यांच्या दिवसभर फेर्‍या राहतात. सिंदखेडराजा वरुन माळसावरगाव, नशिराबाद, अंचली, दरेगाव, वसंतनगर, डावरगाव, धांदरवाडी, दत्तापूर, शेलु, भोसा या गावामधील ३५0 विद्यार्थीनी व विद्यार्थी, पासधारक असून मानव विकास यंत्रणेची एकही बसगाडी नाही. इतर बसगाड्या सकाळी ७, ८.३0, ९.४५ वाजता आहे. परंतु शाळेच्या वेळेवर विद्यार्थीनी व प्रवाशी प्रचंड गर्दीमुळे असंख्य विद्यार्थी जागा नसल्यामुळे शाळेत येऊ शकत नाही. त्यामुळे बर्‍याच विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे. सिंदखेडराजा ते गारखेड मार्गावर सावखेड तेजन, हनवतखेड, माहेरखेड, सुलजगाव, वडाळी, वाघुरा, खामगावखापरखुटी ही गावे असून अहिल्याबाई होळकर मोफत पास योजनेअंतर्गत विद्यार्थीनींची संख्या १८५ असून मानव विकासची एकच बसगाडी आहे. इतर बसगाड्या सकाळी ६.१५, ८.४५, १0.३0, ९ वाजता फेर्‍या मारतात. १८५ पासधारक व प्रवाशी गर्दीमुळे विद्यार्थ्यांचे हाल सुरु आहे.