शहरं
Join us  
Trending Stories
1
Petrol Diesel price hike: महागाईच्या झळा सुरू, पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ! प्रति लिटर ३ रुपयांनी महाग झाले इंधन
2
India-Russia Oil Import News: फक्त २४ तास बाकी! रशियन तेलाला 'ब्रेक'; भारतात पेट्रोल-डिझेलचा तीव्र तुटवडा निर्माण होणार?
3
Sunil Bharti Mittal: अदानी-अंबानींच्या मार्गावर सुनील मित्तल; १० वर्षांत सोडणार Airtel ची खुर्ची, कोण असेल उत्तराधिकारी?
4
आजचे राशीभविष्य - १५ मे २०२६, आर्थिक स्थिती मजबूत दिसेल; गैरसमजा पासून जपून राहावे
5
नॉर्मल पेट्रोल आणि प्रीमियम पेट्रोल म्हणजे काय? दोन्हीच्या किमतीत किती फरक असतो? जाणून घ्या...
6
अग्रलेख : अजितदादा, हे पाहताय ना?
7
'नीट'चे पेपरचोर रडारवर, अधिकाऱ्यांवरही संशय; पुण्यातील महिलेच्या २१ बँक खात्यांत लाखोंचे व्यवहार
8
राखीव प्रवर्गाची सवलत घेतलेल्या उमेदवारांना खुल्या प्रवर्गात ‘नो एंट्री’, राज्य सरकारचा मोठा निर्णय
9
विशेष लेख: महाराष्ट्रातही लाखो मतदार वगळले जातील का?
10
चिनी जहाजांसाठी होर्मुझ पुन्हा उघडले; ट्रम्प-जिनपिंग चर्चा सुरू असताना इराणचा निर्णय
11
उत्तर प्रदेशात पावसाच्या जोरदार तडाख्याने १११ जणांचा मृत्यू; एक जण ५० फूट उडाला
12
महाराष्ट्रात एसआयआर; ३० जूनपासून होणार मतदारांची पडताळणी; १६ राज्ये, ३ केंद्रशासित प्रदेशांमध्ये तिसरा टप्पा  
13
‘प्रतिस्पर्धी नको, आपण भागीदार बनू; व्यापार युद्धात कोणीच विजयी नसतो’, शी जिनपिंग यांच्या ट्रम्प यांना कानपिचक्या
14
भारतीय रोज किती सोने खरेदी करतात? सरासरी दोन टन!
15
जावेद जाफ़रीच्या पत्नीची १७.५ कोटींची फसवणूक: वादग्रस्त महापालिका सहायक आयुक्त पाटीलसह साथीदारांविरुद्ध गुन्हा; पटेलला अटक
16
महाराष्ट्रात काटकसर सुरू! अधिकारी आठवड्यातून किमान १ दिवस फिरणार रेल्वे, बसने
17
“१४ वर्षांचा वनवास संपला, स्वगृही परतलो, माझ्यात DNA…”; आनंद परांजपेंचा शिंदेसेनेत प्रवेश
18
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
19
हा पराभव पचवणं कठीण; सलग पाचव्या पराभवानंतर तिलक वर्माचं नाव घेत काय म्हणाला श्रेयस अय्यर?
20
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
Daily Top 2Weekly Top 5

विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस

By admin | Updated: May 15, 2014 00:39 IST

साखरखेर्डा परिसरात बुधवारी दुपारच्या दरम्यान विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने हजेरी लावली

साखरखेर्डा : मृगनक्षत्र सुरु व्हायला जेमतेम तीन आठवड्याचा वेळ असतांना साखरखेर्डा परिसरात बुधवारी दुपारच्या दरम्यान विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शेतकरी बांधवांपुढे पुन्हा एकदा आसमानी संकट उभे ठाकले आहे. यंदाचा खरीप हंगाम जवळ आला आहे. शेतकरी बांधव शेतीच्या मशागतीच्या कामाला लागला आहे. गत तीन महिन्यात परिसराला अनेकदा अवकाळी पावसाने आणि वादळी वार्‍यासह गारपीटीने झोडपले. त्यामुळे रब्बीच्या पिकांसहीत फळबागांचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले. यामधील नुकसानग्रस्तांना अद्याप आर्थिक मदतीची प्रतिक्षा आहे. आसमानी संकटामधून सावरायलाही त्यांना वेळ मिळत नाही. त्यातच पुन्हा एकदा वादळीवार्‍यासह विजेचा कडकडाटासह तासभर मुसळधार पाऊस कोसळला. त्यामुळे परिसरातील मोठमोठी वृक्षही उन्मळून पडली होती. साखरखेर्डा-शेंदुर्जन मार्गावर तर पाच ते सहा मोठमोठी वृक्ष वादळी वार्‍याने पडली होती. त्यामुळे या रस्त्यावरील वाहतूकही ठप्प झाली होती. युद्ध पातळीवर मोठमोठी झाडे हटविण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाचे संतोषराव मोरे करीत होते. तसेच विद्युत पुरवठाही खंडीत झाला होता. अचानक आलेल्या या वादळीवार्‍यासह अवकाळी पावसामुळे शेतकरी बांधवांच्या समस्येत आणखी भर पडली आहे. यंदा उन्हाचा पारा क्वचित ४0-४१ डिग्री सेल्सीअस पर्यंत पोहचला. त्यामुळे कडाक्याचा उन्हाळा जाणवला नाही. ८-१५ दिवसांपासून येणारे आभाळ आणि अवकाळी पाऊस त्यामुळे यंदा पावसाळा कसा असेल, पाऊस केव्हा सुरु होईल? असे अनेक प्रश्न बळीराजाची चिंता वाढवित आहे. या बदलत्या हवामानामुळे खरीप पिकाचे नियोजन कसे करावे, कोणते पीक घ्यावे, याबाबत शेतकरीबांधव संभ्रमावस्थेत आहे.