रेतीची अवैध वाहतूक ; आठ ट्रॅक्टरवर कारवाई

By Admin | Updated: May 24, 2014 00:09 IST2014-05-22T22:49:14+5:302014-05-24T00:09:06+5:30

भरारी पथकाने गेल्या दोन दिवसात अवैध उत्खनन करणार्‍या ८ ट्रॅक्टधारकांविरुध्द धडक मोहिमेद्वारे दंडात्मक कारवाई केली.

Illegal transportation of sand; Action on eight tractors | रेतीची अवैध वाहतूक ; आठ ट्रॅक्टरवर कारवाई

रेतीची अवैध वाहतूक ; आठ ट्रॅक्टरवर कारवाई

जळगाव जामोद : तालुक्यातील पूर्णा नदीचे पात्रातून होत असलेल्या रेतीचे अवैध वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी भरारी पथकाने गेल्या दोन दिवसात अवैध उत्खनन करणार्‍या ८ ट्रॅक्टधारकांविरुध्द धडक मोहिमेद्वारे दंडात्मक कारवाई केली. तालुक्यात पूर्णा नदीपात्रातून अवैधरित्या विनापरवाना रेतीची उचल केल्या जात आहे. त्यामुळे तालुका महसूल प्रशासनाने यावर पायबंद बसावा यासाठी पथकाचे गठण केले आहे. या पथकाने २१ मे आणि २२ मे रोजी खांडवी व झाडेगाव शिवारातील पूर्णा नदीपात्रात नायब तहसीलदार एस.डी. राठोड, व्ही.एस. डाबेराव, व त्यांचे पथकाने भेट दिली असता एकूण ८ ट्रॅक्टरवर अवैध रेतीचे उत्खनन करुन वाहतूक करीत असतांना आढळून आले. सदर ट्रॅक्टरमालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येवून एकूण २८ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. तसेच यानंतर अवैध रेतीचे उत्खनन व वाहतूक केल्यास फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येईल अशा सूचना तहसीलदार बी. एन. चव्हाण यांनी दिल्या.

Web Title: Illegal transportation of sand; Action on eight tractors