अवैध रेतीची तस्करी; चार टिप्पर पकडले

By Admin | Updated: April 17, 2017 00:36 IST2017-04-17T00:36:08+5:302017-04-17T00:36:08+5:30

धाड: बुलडाणा-धाड-औरंगाबाद मार्गावर १५ एप्रिल रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास जिल्हाधिकारी विजय झाडे यांनी रेतीची अवैध तस्करी करणाऱ्या चार टिप्परवर कारवाई केली आहे.

Illegal smuggling; Four tips grabbed | अवैध रेतीची तस्करी; चार टिप्पर पकडले

अवैध रेतीची तस्करी; चार टिप्पर पकडले

धाड: ग्राम ढालसावंगी ते म्हसलादरम्यान बुलडाणा-धाड-औरंगाबाद मार्गावर १५ एप्रिल रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास जिल्हाधिकारी विजय झाडे यांनी रेतीची अवैध तस्करी करणाऱ्या चार टिप्परवर कारवाई केली आहे.
बुलडाणा जिल्हाधिकारी डॉ. विजय झाडे हे दुपारी धाड भागातून जात असताना बुलडाणा तालुक्यातील ग्राम ढालसावंगीपासून ते म्हसला गावापर्यंत औरंगाबाद रोडवर माहोराकडून येणाऱ्या टिप्पर क्र. एम.एच. २८- बी ८४१७, एम.एच. २८ एबी ७६१६, एम.एच.२८-एबी ७९६२, एमएच २८ एबी ७८०५ हे चार टिप्पर रेतीची वाहतूक करताना आढळून आले. या टिप्परची तपासणी केली असता परवान्यापेक्षा जास्तीची रेती टिप्परमध्ये दिसून आल्याने या ठिकाणी सर्व टिप्पर पोलीस ठाणे धाड येथे जमा करून त्यांच्या आदेशानुसार मंडळ अधिकारी अशोक शेळके यांनी धाड पोलिसात तक्रार दिली. यावरून वरील चार टिप्परचे चालक, मालक आरोपी नजीमोद्दीन म. अकबर रा. रायपूर, बळीराम उबरहंडे रा. खासगाव, विठ्ठल कुसळकर रा. देवपूर व कौतिकराव जाधव रा. मढ यांच्या विरुद्ध भादंवि क्र. ३७९, २१ (१)(२) गौण खनिज कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ठाणेदार सुनील जाधव यांच्या मार्गदर्शनात पीएसआय गजानन मुंढे, ऋषिकेश पालवे, विजय मेहेत्रे हे करीत आहे.

Web Title: Illegal smuggling; Four tips grabbed