शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच सैन्याकडून बंगालच्या उपसागरात NOTAM जारी; पाकिस्तानशी आहे खास संबंध
2
भाजपचा बंगालमध्ये ऐतिहासिक विजय! मुख्यमंत्रीपदासाठी ४ नावांची चर्चा; शपथविधी सोहळ्याची मोठी तयारी
3
चिनी नागरिक स्वत:ला नेपाळी भासवत होता, नेपाळी नंबरची स्कूटर घेऊन भारतात घुसला अन्...
4
LNG Supply: कतारकडून पुरवठा थांबला, भारतानं कंबर कसली; ७ नव्या टाक्यांचा 'यासाठी' उपयोग होणार, काय आहे संपूर्ण प्लॅन
5
तिघांनी हल्ला केला, कोयता डोक्यात अडकला; सायन रुग्णालयातील थरारक व्हिडिओ, तो तरुण नेमका कोण?
6
Adhik Maas 2026: तब्बल ११ वर्षांनंतर दुर्मिळ योग! अधिक मासात सुख समृद्धीसाठी 'या' तीन गोष्टींचे करा दान!
7
ब्राझीलमध्ये विमान थेट इमारतीला धडकले; अपघाताचा थरारक Video आला समोर, ३ जण दगावले
8
लग्नाच्या पहिल्या वाढदिवसापूर्वीच संसार उद्ध्वस्त; शेजारणीवर जीव जडला, बायकोचा काटा काढला
9
‘सरकारने कुठलाही विचार न करता या आरोपीला हालहाल करून संपवावं’, नसरापूर प्रकरणी राज ठाकरेंचा रोखठोक सल्ला
10
Crude Oil Price Today: कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ: इराणच्या UAE वरील हल्ल्यानंतर ब्रेंट क्रूड $११४ पार; जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचे दर
11
आता पुढचे लक्ष्य अखिलेश यादव; ममता बॅनर्जींचा पराभव करणाऱ्या सुवेंदू अधिकारींनी थोपटले दंड
12
Gold Silver Price Today : सोनं महागलं, चांदी झाली स्वस्त; आज काय आहेत नवे दर? पटापट चेक करा
13
कॅनडाचे दोन तुकडे होणार? स्वतंत्र देशासाठी जनमत संग्रहाची मागणी; प्रादेशिक उपेक्षा भोवली
14
Marathi News LIVE : इराणच्या हवाई हल्ल्यात तीन भारतीय जखमी, भारताने व्यक्त केला संताप 
15
Raja Shivaji Box Office: रितेश देशमुख ठरला बॉक्स ऑफिसचा 'राजा'! ४ दिवसांत सिनेमाची किती कोटींची कमाई?
16
'आग लगा दी बस्ती में...!' दोन जुळ्या भावांनी केले एकाच मुलीशी लग्न; नवरीचा चेहरा पाहून नेटकरी संतापले 
17
अवघ्या एका मताने फैसला, या मतदारसंघात रंगली रोमांचक लढत, कुणी मारली बाजी?
18
राज्य महिला आयोग अध्यक्षपदी माजी IPS अधिकारी मीरा बोरवणकर यांची निवड?; जाणून घ्या सत्य
19
राजकारणात 'ब्लॉकबस्टर' एन्ट्री घेणाऱ्या थलापती विजयनं आई वडिलांविरोधात खटला का दाखल केला होता?
20
Stock Market Today: रेड झोनमध्ये शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात; 'या' शेअर्समध्ये मोठी घसरण
Daily Top 2Weekly Top 5

हातपंप दुरूस्तीकडे दुर्लक्ष

By admin | Updated: November 22, 2014 23:47 IST

देऊळगावराजा व सिंदखेडराजा तालुक्यात ६८७ हातपंप.

देऊळगावराजा (बुलडाणा) : सध्या पाणीटंचाईचे सावट हळूहळू जाणवत असले तरी देऊळगावराजा, सिंदखेडराजा या दोन तालु क्यामध्ये असलेल्या एकूण ६८७ हातपंप दुरुस्तीसाठी केवळ एकच दुरुस्ती वाहन असून, यासाठी कर्मचारी अपुरे तसेच यंत्रणा असक्षम असल्याची धक्कादायक बाब समोर येत आहे.शासन स्तरावर ग्रामीण भागातील जनता तहानलेली राहू नये, यासाठी राज्यशासन दरवर्षी कोट्यवधी रुपयांची तरतूद करत अस ते. सध्या ग्रामीण भागात चौका-चौकामध्ये ग्रामपंचायतीने हातपंप बसविलेले आहेत. काही ठिकाणी मुबलक पाणीसाठा आहे. प्र त्येक गावामध्ये पाणीपुरवठय़ाची सार्वजनिक विहीर ग्रामपंचाय तीच्या ताब्यात असताना केवळ भारनियमनामुळे गावकर्‍यांना पाणीपुरवठा करणे शक्य होत नाही. यासाठी गावोगावी बोअर घेऊन त्यावर ग्रामपंचायत हातपंप बसविते, यासाठी शासनाचे शंभर टक्के अनुदान शासन स्तरावरुन देण्यात येते; मात्र सदर हातपंप दुरुस् तीसाठी प्रतिहातपंप रु. २000 चे शुल्क वार्षिक प्रमाणे भूजल सर्वेक्षक विभाग जि.प.बुलडाणा यांच्याकडून आकारण्यात येत असल्याची माहिती संबंधित विभागाचे पी.टी.बोरकर यांनी लोकम तशी बोलताना दिली. हातपंप दुरुस्तीबाबत शासनाची उदासीनता प्रत्येक खेड्यामध्ये सध्या दिसून येते. जिल्हा परिषद स्तरावर तालु क्याच्या ठिकाणी विविध पंचायत समित्यांवर पंचायत समिती सभा पती यांची समिती असते तर जिल्हा परिषदेवर जि.प.अध्यक्ष यांच्या अधिपत्याखाली जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती पंचायत समि तीखाली काम करतात.देऊळगावराजा पंचायत समिती अंतर्गत एकूण ४८ ग्रामपंचायती आहेत तर सिंदखेडराजा पं.स.मध्ये ७९ ग्रामपंचायती आहेत. या दोन तालुक्यांमध्ये ग्रामीण भागामध्ये ६८७ हातपंप आहेत. हातपंप वीजपुरवठा असो किंवा नसो, केवळ हाताने पंप मारल्यास केव्हाही पाणी उपलब्ध असते; परंतु या ६८७ पंपाची दुरुस्ती करण्यासाठी दे.राजा आणि सिं.राजा या दोन तालुक्यासाठी केवळ एकच दुरुस्ती वाहन उपलब्ध असून, यावर काम करणार्‍या कर्मचार्‍यांची संख्या अपुरी आहे, तर हातपंप दुरुस्तीबाबत ग्राम पंचायत सहकार्य करुन शुल्क भरत नसल्याची खंत भूजल सर्वेक्षण विभागाचे बोरकर यांनी व्यक्त केली तर देऊळगावराजा पंचायत समितीचे सहायक स्थापत्य अभियांत्रिक एस.जी.साळवे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले की, दुरुस्तीची गाडी (वाहन) दोन तालुक्यातून आठवड्यामधून आपल्या तालुक्याला एकदाच देण्यात येते, अशी परिस्थिती असताना हातपंप दुरुस्त करुन ग्रामीण जन तेची तहान भागविण्यासाठी शासनाने योग्य पाऊल उचलून पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा बामखेडचे सरपंच परमेश्‍वर घोंगे यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केली.