कुरखेड येथील सभागृहाचे काम अर्धवट!

By Admin | Updated: May 24, 2014 00:11 IST2014-05-23T23:43:27+5:302014-05-24T00:11:36+5:30

सार्वजनिक बांधकाम विभागाचेही दुर्लक्ष; गावकरी श्रमदान आणि लोकवर्गणीतून कामे पूर्ण करीत आहेत.

Houses of the house in Kurkhed partially! | कुरखेड येथील सभागृहाचे काम अर्धवट!

कुरखेड येथील सभागृहाचे काम अर्धवट!

जलंब: शेगाव तालुक्यातील कुरखेड येथे विदर्भ वैधानिक मंडळाअंतर्गत हनुमान मंदिराजवळ सभागृह मंजूर झाले आहे. या सभागृहाच्या बांधकामास गेल्या दोन वर्षांपूर्वी सुरूवात करण्यात आली. काही काम झाल्यानंतर संबधीत कंत्राटदार गायब झाला असल्याने सभागृहाचे काम रखडले आहे. दोन वर्षांपूर्वी सभागृहाच्या बांधकास सुरूवात झाली. सभागृहाचा पाया, कॉलम आणि स्लॅबचे काम पुर्णत्वास गेले आहे. मात्र, त्यानंतर संबधीत कंत्राटदाराने काम अर्धवट सोडून दिले आहे. त्यामुळे गेल्या दीड वर्षांपासून या सभागृहाचे बांधकाम जैसे थे या अवस्थेत आहे. उर्वरीत कामासाठी कंत्राटदाराला विचारणा केल्यास, तो फोन उचलत नाही. उचलल्यास उडवा-उडवीची उत्तरे देत असल्याचा आरोप गावातील नागरिकांचा आहे. याबाबत स्थानिक प्रशासनही गंभीर नसल्याचे चित्र आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचेही याकडे दुर्लक्ष असल्याने मंदिरा लगत इतर काही कामे गावकरी श्रमदान आणि लोकवर्गणीतून पूर्ण करीत आहेत.

Web Title: Houses of the house in Kurkhed partially!