जामोद येथे घर,गोठ्यास आग

By Admin | Updated: May 4, 2017 00:25 IST2017-05-04T00:25:49+5:302017-05-04T00:25:49+5:30

जामोद : येथे दोन वेगवेगळ्या ठिकाणी लागलेल्या आगीत चार लाखांचे नुकसान झाले.

Home at Jamod, fire in the cemetery | जामोद येथे घर,गोठ्यास आग

जामोद येथे घर,गोठ्यास आग

जामोद : येथे दोन वेगवेगळ्या ठिकाणी लागलेल्या आगीत चार लाखांचे नुकसान झाले. जामोद येथील पेठ भागात राहणारे गजानन जगदेव सातव यांच्या राहत्या घराला व लागूनच असलेल्या लक्ष्मण कुवर यांच्या गुरांच्या गोठ्याला २ मे च्या मध्यरात्रीनंतर १ वाजताच्या सुमारास आग लागल्याने सातव यांचे घर खाक झाले.
कुवर यांचा गोठ्यातील शेती उपयोगी साहित्य जळून खाक झाले. सुदैवाने यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. रात्री झोपेत असताना सातव यांच्या मुलाला आगीचा चटका लागल्यामुळे जाग आली व त्यांनी आरडाओरड करताच आई, वडिलांसह मोहल्ल्यातील सर्व नागरिक धावून आले; परंतु तोपर्यंत आगीने रौद्ररूप धारण केले होते.
परिसरातील सर्व नागरिकांनी आग विझवण्यासाठी खूप प्रयत्न केले व आग अटोक्यात आणली; परंतु गजानन सातव यांच्या घरातील धान्य, कपडे तसेच संसारोपयोगी सर्व साहित्याची राखरांगोळी झाली. ३ मे च्या सकाळी ७ वा. जळगाव जामोदचे तहसीलदार अनिल हेळकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
तसेच जामोद येथील तलाठी काळे यांनी पंचनामा करून गजानन सातव यांचे २ लाख ८३ हजार रुपयांचे नुकसान व लक्ष्मण कुवर यांचे ८० हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगितले.
आग शॉर्ट सर्र्किटमुळे लागल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. जळगाव जामोद पंचायत समितीचे उपसभापती रामेश्वर राऊत यांनी घटनास्थळी भेट दिली.

Web Title: Home at Jamod, fire in the cemetery