शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
2
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
3
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
4
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
5
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
6
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
7
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
8
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
9
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
10
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
11
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
12
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
13
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
14
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
15
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
16
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
17
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
18
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
19
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
20
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
Daily Top 2Weekly Top 5

गणरायांच्या आगमनासोबत दमदार पाऊस

By admin | Updated: September 17, 2015 23:27 IST

बुलडाणा जिल्ह्यात पावसाची हजेरी; दोन दिवसात ४८८ मि.मी पाऊसाची नोंद.

खामगाव : मागील १५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्यानंतर मंगळवारपासून परतीच्या पावसाने जिल्ह्यात हजेरी लावली; मात्र गुरुवारी गणरायांच्या आगमनासोबतच संपूर्ण जिल्ह्यात सर्वदूर पाऊस पडल्याने समाजमन आनंदले आहे. सध्या पाऊस परतीच्या मार्गावर असून, या आठवड्याभरात दुसर्‍यांदा पावसाने जिल्ह्याला झोडपून काढले. मंगळवारी सायंकाळनंतर जिल्ह्यात दमदार पाऊस झाला. तर बुधवारी पुन्हा रात्रीपासून वादळ वार्‍यासह पावसाला सुरुवात झाली, गुरुवार दुपारपर्यंत जिल्हाभरात पाऊस सुरुच होता. गत दोन दिवसात जिल्ह्यात ४८८.८ मि.मी पाऊस झाल्याची नोंद जिल्हा प्रशासनाने केली. याची सरासरी ३७.६ एवढी आहे. तर १७ सप्टेंबर रोजी दुपारी झालेल्या पावसामुळे मोताळा तालुक्यात काही ठिकाणी घरांची पडझड झाली तर पिकांना फटका बसला. जिल्ह्यात दोन तासात १४३.८ मि.मी.पावसाची नोंद झाली. तर बुधवारी सायंकाळी पुन्हा जिल्ह्याला वादळवार्‍यास मुसळधार पावसाने झोडपून काढले. आज, १७ सप्टेंबरच्या दुपारपर्यंत पाऊस सुरुच होता. बुलडाणा शहरासह सागवण, सुंदरखेड, भादोला कोलवट भागात पावसाचा मोठा फटका बसला; तसेच धाड परिसरातील चांडोळ, म्हासरुळ, वरुड, म्हसला, जामठी, डोमरुळ, टाकळी, जाम, धामणगाव धाड परिसरात या परतीच्या पावसामुळे पिकांचे नुकसान झाले. तर काही ठिकाणची जमीनही खरडून निघाली. मोताळा तालुक्यात पावसामुळे बुधवार, १६ सप्टेंबर रोजी वादळी वार्‍यासह पाऊस आला. काही भागात अतवृष्टी झाली होती. यामुळे डिडोळा खु., डिडोळा बु., घुसर, सिंदखेड लपाली, पिंपळगाव देवी, निपाना आदी परिसरात सोयाबीन, कपाशी, ज्वारी पिकांचे मोठे नुकसान झाले. तर वादळवार्‍यामुळे काही ग्रामस्थांच्या घरावरील पत्रे उडून गेली. काही ठिकाणी वृक्षही उन्मळून पडले, तर आज, १७ सप्टेंबर रोजीही तालुक्यात पावसाने हजेरी लावली.