सावित्रीबाई फुलेंना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 05:01 IST2021-03-13T05:01:34+5:302021-03-13T05:01:34+5:30

मेहकर : येथील संकल्प अर्बनच्या वतीने सावित्रीबाई फुलेंना स्मृतिदिनानिमित्त संस्थेच्या कार्यालयात अभिवादन करण्यात आले. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष श्रीराम ...

Greetings to Savitribai Phule | सावित्रीबाई फुलेंना अभिवादन

सावित्रीबाई फुलेंना अभिवादन

मेहकर : येथील संकल्प अर्बनच्या वतीने सावित्रीबाई फुलेंना स्मृतिदिनानिमित्त संस्थेच्या कार्यालयात अभिवादन करण्यात आले.

अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष श्रीराम बेंडमाळी हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. डी.एफ. माल, रामदास काटकर, वामनराव झोरे, वसंतराव मगर, मदनराव इरतकर, शरद वानखेडे, राजकुमार जयस्वाल, शैलेश बावणे, गजानन मगर, डॉ. सुधीर राऊत, नामदेवराव सोभागे, डॉ. सुखदेव खरात, जयश्री घुमरे, व्यवस्थापक बी.डी. राठोड, संतोष सोनवणे, संदीप चोपडे, अशोक भराड, अमोल खडकघरे आदी उपस्थित होते. प्रास्ताविक व्यवस्थापक बी.डी. राठोड यांनी केले. यावेळी श्रीराम बेंडमाळी, शरद वानखेडे आदींनी मार्गदर्शन केले. संचालन संतोष सोनवणे यांनी केले.

Web Title: Greetings to Savitribai Phule