शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
4
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
5
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
6
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
7
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
8
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
9
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
10
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
11
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
12
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
13
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
14
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
15
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
16
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
17
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
18
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
19
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
20
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
Daily Top 2Weekly Top 5

हरितक्रांतीसाठी लावलेला झाडांना घरघर!

By admin | Updated: May 4, 2017 00:29 IST

शेगाव- नगर परिषद, सामाजिक वनीकरण व सा.बां. विभागाच्या देखरेखीखाली असलेल्या झाडांमधील अनेक झाडे पाण्याअभावी सुकून शेवटच्या घटका मोजत आहेत.

नगरपालिका, सामाजिक वनीकरण विभागाचे दुर्लक्षशेगाव : मोठा गाजावाजा करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार शहरात अनेक जागी झाडे लावण्यात आली. मात्र, नगर परिषद, सामाजिक वनीकरण व सा.बां. विभागाच्या देखरेखीखाली असलेल्या झाडांमधील अनेक झाडे पाण्याअभावी सुकून शेवटच्या घटका मोजत आहेत. मात्र, या विभागाच्या अधिकाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे.वृक्षतोड मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे संपूर्ण जग ग्लोबल वार्मिंगच्या परिणामांशी झुंज देत आहे. याचा परिणाम अतिशय हानीकारक होत असून, पावसाची सरासरी कमी झाली आहे. उन्हाळा वाजवीपेक्षा जास्त तापत आहे. या सर्व बाबींचा विचार करून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हरितक्रांतीचा नारा देऊन १० कोटी वृक्षांची लागवड करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवले होते. त्यासाठी कोट्यवधी रुपयांचे अनुदानही देण्यात आले. अनुदान मुबलक मिळाल्यामुळे नगर परिषद, सामाजिक वनीकरण व सा.बां. विभागाकडून रस्त्याच्या कडेला वृक्षांची लागवड मोठा गाजावाजा करून करण्यात आली. मात्र, या विभागाच्या अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे आज अशी परिस्थिती निर्माण झाली आहे, की अभियानांतर्गत लावण्यात आलेल्या वृक्षांपैकी जवळपास ३० ते ४० टक्के वृक्ष पाणी व देखरेखीअभावी शेवटची घटका मोजत आहेत. शहरातील झाडेगाव रस्त्यालगतची अनेक झाडे सुकली आहेत. भुतबंगला रोडवर सा.बां. विभागाकडून लावण्यात आलेली झाडे लागवडीनंतर काही दिवसातच बकऱ्यांनी खावून टाकली आहेत. न.प.कडून लावण्यात आलेल्या अनेक ठिकाणच्या वृक्षांची अशीच परिस्थिती आहे. सामाजिक वनीकरणकडून ग्रामीण परिसराकडे जाणाऱ्या रस्त्यांवर लावण्यात आलेली झाडे पाण्याअभावी सुकत आहेत. झाडेगाव फाटा ते वाटिकापर्यंत असलेल्या दुभाजकामधील फुलझाडेही पाण्याअभावी सुकत आहेत. न.प.कडून या झाडांना पाणी दिल्या जाते. मात्र, ते कमी पडते. तरी संबंधितांनी याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे. तर झाडांना अजूनही मिळू शकते संजीवनीवृक्ष लागवडीनंतरची ही परिस्थिती पाहता शासनाचाच एक भाग असलेले हे सर्व विभाग शासनाच्या आदेशालाच खो देत असल्याचे दिसून येत आहे. अजूनही वेळ गेलेली नाही. मरणावस्थेकडे जात असलेल्या झाडांना पाणी देऊन संजीवनी देण्याचे काम आताही केले जाऊ शकते. त्यासाठी केवळ इच्छाशक्तीची गरज भासेल, एवढे मात्र खरे!