मलकापूर तालुक्यात मुलींचा जन्मदर घटला

By Admin | Updated: April 25, 2017 00:13 IST2017-04-25T00:13:32+5:302017-04-25T00:13:32+5:30

मलकापूर- मलकापूरमध्ये मुलींचा जन्मदर घटत असल्याची बाब गत वर्षाच्या प्राप्त आकडेवारीवरून स्पष्ट झाली आहे.

Girls' birth rates in Malkapur taluka reduced | मलकापूर तालुक्यात मुलींचा जन्मदर घटला

मलकापूर तालुक्यात मुलींचा जन्मदर घटला

मनोज पाटील - मलकापूर
मलकापूरमध्ये मुलींचा जन्मदर घटत असल्याची बाब गत वर्षाच्या प्राप्त आकडेवारीवरून स्पष्ट झाली आहे. त्यामुळे आता येथे मुलींचा जन्मदर वाढावा यादृष्टीने व्यापक स्वरूपाची चळवळ उभी करणे गरजेचे झाले आहे. मलकापुरातील आरोग्य विभागातुन प्राप्त केलेल्या माहितीनुसार १ एप्रिल २०१६ ते ३१ मार्च २०१७ या मागील वर्षात शासकीय रूग्णालयात २५३ मुलं तर २०५ मुली तसेच खासगी रूग्णालयांमध्ये ६९७ मुलं तर ६४८ मुली असा जन्मदर आहे.यामध्येही शासकीय रूग्णालयात ३ मुलं व २ मुली तर खासगी रूग्णालयांमध्ये ३ मुलं व २ मुली असा ५-५ बालकांचा उपजत मृत्यू झाल्याची नोंद आहे. एकंदर गत वर्षभरात मुलांचा ९५० तर मुलींचा ८५३ असा जन्मदर असून समानतेच्या दृष्टीने जन्मलेल्या बालकांमध्ये ९७ ची तफावत आहे. अर्थातच या आकडेवारीवरुन मुलींचा जन्मदर घटल्याचे स्पष्ट झाले आहे. मोठ्या प्रमाणात जनजागृती होवूनही मुलींचा जन्मदर हा घटलेलाच आहे.

१२ जानेवारी १५९८ रोजी सिंदखेडराजा येथे जिजाऊंचा जन्म झाला. त्यावेळी वडील लखुजीराजे जाधव यांनी हत्तीवर बसुन साखर वाटली व मुलीच्या जन्माचे स्वागत केले. असा इतिहास या जिल्ह्याला लाभलेला आहे. त्याच जिल्ह्यातील मलकापूर तालुक्यात मात्र मुलींचा जन्मदर घटला आहे. ही बाब निश्चितच खेदजनक आहे. त्यामुळे आता सामाजिकदृष्ट्या चळवळ उभी करण्याची गरज आहे.
- मंगला पाटील, माजी नगराध्यक्षा

Web Title: Girls' birth rates in Malkapur taluka reduced