शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

जि.प.कर्मचा-यास महिलेने दिला चोप

By admin | Updated: December 24, 2014 00:20 IST

बुलडाणा जिल्हापरिषद आवारातील घटना.

बुलडाणा : पेन्शनचे बिल काढण्यास विलंब करणार्‍या माध्यमिक शिक्षण विभागाच्या एका कर्मचार्‍यास संतप्त महिलेने चपलेने मारहाण केल्याची घटना आज २३ डिसेंबर रोजी सकाळी जिल्हा परिषदेच्या आवारात घडली. गेल्या काही महिन्यांपासून एक महिला जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागात थकलेले पेन्शनचे बिल काढण्यासाठी शिक्षण विभागाचे उंबरठे झिजवीत होती; परंतु संबंधित कर्मचारी गजानन वाकोडे हा हेतुपुरस्सर त्रास देत होता. दरम्यान, आज महिलेने शिक्षण विभाग गाठले असता पुन्हा गजानन वाकोडे त्याने उलट-सुलट उत्तरे दिली. त्याचे उत्तर ऐकून संतप्त झालेल्या महिलेने चहा घेण्यासाठी त्याला कार्यालयाबाहेर काढले; तसेच जिल्हा परिषदेच्या आवारात येताच पायातील चप्पल काढून धुलाई करण्यास सुरुवात केली. अचानक घडलेल्या घटनेमुळे सर्व कर्मचारी अचंबित झाले होते, यावेळी घटनास्थळी एकच गर्दी झाली होती. विशेष म्हणजे सदर मारहाणीची घटना घडत असतानादेखील एकाही कर्मचार्‍याने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला नाही. या मारहाण प्रकरणाची अद्याप पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली नसली तरी या प्रकरणाची योग्य चौकशी करून दोषीवर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश देशमुख यांनी दिली.