शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
3
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
4
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
5
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
6
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
7
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
8
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
9
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
10
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
11
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
12
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
13
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
14
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
15
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
16
खारेगाव टोलनाक्यावर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत भांडुपमधील दाम्पत्याचा जागीच मृत्यू
17
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
18
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
19
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
20
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

मोताळा तालुक्यात मुलीच आघाडीवर

By admin | Updated: May 31, 2017 00:23 IST

९३.२३ टक्के निकाल : मुलींची टक्केवारी ९४.१७

लोकमत न्यूज नेटवर्कमोताळा : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेबु्रवारी-मार्च २०१७ मध्ये घेतलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल ३० मे रोजी दुपारी एक वाजता आॅनलाइन जाहीर करण्यात आला. इंटरनेटच्या साह्याने मिळालेल्या निकालानुसार मोताळा तालुक्याचा निकाल नियमित विद्यार्थ्यांचा ९३.२३ टक्के लागला असून, रिपीटर विद्यार्थ्यांचा निकाल ४६.५५ टक्के तर एकूण निकाल ९३.२३ टक्के लागला आहे. निकालामध्ये मुलांची टक्केवारी ९२.५२ असून मुलींची टक्केवारी ९४.१७ इतकी आहे. निकाल वेळेत घोषित झाल्याने विद्यार्थ्यांसह पालकांवरील ताण कमी झाला असून उत्साहाचे वातावरण आहे.मोताळा तालुक्यात १६ उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालयामार्फत १६८३ नियमित विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यांच्यापैकी १५६९ उत्तीर्ण झाले आहेत. त्यांची टक्केवारी ९३.२३ इतकी असून ११६ विद्यार्थी रिपीटर यापैकी ५४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यांची टक्केवारी ४६.५५ टक्के आली आहे. शहरातील स्व.बबनराव देशपांडे कनिष्ठ महाविद्यालय मोताळा (विज्ञान १००, आर्ट ८४.४४, कॉमर्स ८७.०३) असा एकूण निकाल ९४.५३ टक्के लागला आहे. प्रियदर्शनी कन्या उच्च माध्यमिक विद्यालय बोराखेडी विज्ञान १०० टक्के तर आर्ट ९१.३९ टक्के असा एकूण निकाल ९५.७८ टक्के, जवाहर उर्दू उच्च माध्य. विद्यालय मोताळा विज्ञान ९५ टक्के तर आर्ट ८४.०९ असा एकूण ९१.१२ टक्के, अनंतराव सराफ कनिष्ठ महाविद्यालय शेलापूर बु: ९३.६१ टक्के, एम.ई.एस. कनिष्ठ महाविद्यालय धामणगाव बढे आर्ट १०० टक्के तर कॉमर्स ९७.२२ आसा एकूण ९८.५८ टक्के, तिरूपती बालाजी कनिष्ठ महाविद्यालय कोऱ्हाळा बाजार ९४.९१ टक्के, स्व. शिवाजीराव भिकुजी पाटील कनिष्ट विद्यालय पोफळी ९३.७५ टक्के, राष्ट्रीय उच्च माध्य. विद्यालय पिंप्रीगवळी आर्ट ८१.९८ तर कॉमर्स ९५.५५ असा एकूण ८५.८९ टक्के, श्री चांगदेव कनिष्ठ महाविद्यालय उबाळखेड ९३.३३ टक्के, कर्मवीर भिकमसिंह पाटील मा. व उच्च माध्य.विद्यालय निपाना ९४.४४ टक्के, कुलस्वामिनी उच्च माध्य.विद्यालय पिंपळगावदेवी ८०.०० टक्के, राजे छत्रपती उच्च माध्य.विद्यालय जयपूर ९२.५० टक्के, नॅशनल उर्दू उच्च माध्यमिक विद्यालय रोहिणखेड १०० टक्के, नवजीवन कनिष्ठ महाविद्यालय रोहिणखेड ९४.२३ टक्के, प्रियदर्शनी गर्ल्स माध्यमिक व उच्च माध्यमिक (एमसीव्हिसी) ९४.५५ आणि जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कोथळी ९०.३२ टक्के निकाल लागला आहे.