शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

घाटपुरी श्री जगदंबा वेद विद्यालयाचे मुख्यमंत्र्यांचे हस्ते भूमिपूजन

By अनिल गवई | Updated: October 3, 2024 16:06 IST

घाटपुरीत साकारणार आंतरराष्ट्रीय दर्जाचे वेद विद्यालय.

अनिल गवई, लोकमत न्यूज नेटवर्क, खामगाव:  श्री जगदंबा संस्थान घाटपुरी येथील जय जगदंबा वेद विद्यालयाचा भूमिपूजन सोहळा गुरूवारी दुपारी मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे आणि रामजन्मभूमी अयोध्याचे कोषाध्यक्ष तथा मथुरा जन्मभूमीचे उपाध्यक्ष प.पू. स्वाामी गोविंददेव गिरीजी महाराज यांच्याहस्ते पार पडला. 

श्री महर्षि वेद व्यास प्रतिष्ठान आळंदीअंतर्गत घाटपुरी येथील श्री जगदंबा माता मंदिरात वेद विद्यालय चालविण्यात येते. या विद्यालयाच्या नूतन वास्तूचा भूमिपूजन सोहळा नवरात्रोत्सवाच्या पहिल्यादिवशी आयोजित करण्यात आला. या सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह  केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव, संदीप नेते, आ. आकाश फुंडकर, आ. संजय सिरसाट, चंद्रकांत पाटील, आ. संजय रायमुलकर, आ. संजय गायकवाड, जागृती आश्रमाचे मठाधिपती प.पू.शंकरजी महाराज, हभप संजय महाराज पाचपोर, बुलढाणा अर्बन बॅकेचे राधेश्याम चांडक आदींची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी पौराहित्य पुणे येथील महेश नंदे, खामगाव येथील आशिष अशोक सराफ,  ब्रिजमोहन भट्टड, अनुजा भट्टड,मदनलाल भट्टड यांनी केले. यावेळी जय जगदंबा वेद विद्यालयाचे अध्यक्ष् पंकज केला, उपाध्यक्ष् कृष्णकुमार भट्टड, सचिव निलेश भैय्या, व्यवस्थापक पुरूषोत्तम भट्टड, योगेश इंदोरिया, घनश्याम भुतडा, निमिष चांडक, राधेश्याम जांगीड, कमलकिशोर मंत्री,  डॉ. मधुसुदन भट्टड, रतन राठी आदींची उपस्थिती होती. खामगाव येथे आगमन झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांनीसर्वप्रथम श्री जगदंबा मातेचे दर्शन घेतले. त्यानंतर ते भूमिपूजन स्थळी पाेहोचले. यावेळी मंदिर परिसरात चोख सुरक्षा व्यवस्था आणि कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यावेळी जगदंबा संस्थान आणि श्री जगदंबा वेद विद्यालयाच्या व्यवस्थापनाकडून मुख्यमंतत्र्यांसह मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाला चार तासांचा विलंब

घाटपुरी येथील भूमिपूजन सोहळ्यानंतर श्रीधर महाराज वारकरी भवन येथे प्रमुख सोहळा आयोजित करण्यात आला होता. मात्र, नियोजित वेळेपेक्षा मुख्यमंत्री तब्बल चार तास विलंबाने पोहोचले. त्यामुळे वारकर्यांच्यासत्कारासह इतर नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आले. 

टॅग्स :khamgaonखामगावEknath Shindeएकनाथ शिंदे