दलित वस्ती सुधार योजनेसाठी निधी

By Admin | Updated: May 19, 2014 00:45 IST2014-05-19T00:13:11+5:302014-05-19T00:45:52+5:30

खामगावातील दलित वस्त्यांमध्ये ४ कोटी ५0 लक्ष रुपयांच्या विकासकामांना मान्यता मिळाली आहे.

Fund for the Dalit Residential Improvement Scheme | दलित वस्ती सुधार योजनेसाठी निधी

दलित वस्ती सुधार योजनेसाठी निधी

खामगाव : दलितवस्ती सुधार योजने अंतर्गत मतदार संघातील विविध गावातील दलित वस्त्यांमध्ये ४ कोटी ५0 लक्ष रुपयांच्या विकासकामांना मान्यता मिळाली आहे. त्या कामांच्या निविदा निघाल्या असून कार्यारंभ आदेश देण्यात आले असल्याचे आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी सांगितले. दलित वस्तीमधील विकास कामांमध्ये शेगाव तालुक्यातील जलंब येथे १0 लक्ष खर्चाच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरातील विकास कामे तसेच दलित वस्तीमधील विकासकामांकरिता माटरगावसाठी १0 लक्ष, वार्ड क्र.४ मध्ये विकास कामांसाठी १0 लक्ष, खेर्डा गावासाठी १0 लक्ष, चिंचखेड येथे विकास कामांसाठी ५ लक्ष, भोनगाव येथे ५ लक्ष खचरून दलित वस्तीमध्ये विकास कामे करणे, आळसणासाठी ५ लक्ष, टाकळी येथे ५ लक्ष, वरुड, गव्हाण येथे प्रत्येकी ५ लक्ष खचरून दलित वस्तीमध्ये विकास कामे, तिंत्रव येथे १0 लक्ष खचरून दलित वस्तीमध्ये विकासकामे, गौलखेड येथे ५ लक्ष खचरून दलित वस्तीमध्ये विकास कामे, तरोडा कसबा येथे १0 लक्ष खचरून दलित वस्तीमध्ये विकास कामे, हिंगणा येथे ५ लक्ष रुपये खचरून दलित वस्तीमध्ये विकास कामे करणे, कुंबेफळ, रोहणा, अंबिकापूर, टेंभूर्णा, गारडगाव, जळका भडंग, घाटपुरी येथे प्रत्येकी १0 लक्ष खचरून दलित वस्तीमध्ये विकास कामे, घारोड, पिंप्री देशमुख, आमसरी येथे प्रत्येकी येथे ५ लक्ष रुपये खचरून दलित वस्तीमध्ये विकास कामे, लांजुड व पिंप्री देशमुख येथे प्रत्येकी ५ लक्ष खचरून दलित बांधवांसाठी स्मशानभूमीला पोचमार्गाचे बांधकाम करणे अशा विकासकामांचा समावेश आहे.

Web Title: Fund for the Dalit Residential Improvement Scheme