शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
2
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
3
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
4
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
5
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
6
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
7
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
8
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
9
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
10
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
11
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
12
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
13
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
14
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
15
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
16
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
17
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
18
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
19
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
20
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
Daily Top 2Weekly Top 5

बंदीजनांची केली पुस्तकांशी मैत्री

By admin | Updated: December 31, 2014 00:13 IST

राज्यातील कारागृहात वाचले जातात २२ हजार पुस्तके !

नीलेश शहाकार/बुलडाणा : राज्यातील विविध कारागृहात हजारो बंदिस्त कैदी आपले एकटेपण घालविण्यासाठी पुस्तकांशी मैत्री करतात. या बंदीजनाकडून विविध विषयावरील २२ हजार पुस्तके वाचले जात आहेत. यामुळे भरकटलेल्या जीवनाला योग्य दिशा मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.समाजात कायदा-सुव्यवस्था राखण्यात कारागृह घटक महत्त्वाचा ठरतो. त्यामुळे कोणी गुन्हा केला तर त्या गुन्ह्याची शिक्षा म्हणून गुन्हेगाराला कारागृहात पाठविले जाते. ठोठावलेल्या शिक्षेसह त्यांच्यात मानसिक विकास घडवून यावा यासाठी वाचन, शारीरिक आणि बौद्धिक खेळ, सांस्कृतिक उत्सवावरही कारागृहात भर दिला जातो.ह्यइट का जबाब पत्थर से देनाह्ण हेच लक्ष्य असणार्‍या बंदीस्त कैद्यांच्या जीवनात शिक्षणाची कास धरून जीवनाचा खरा अर्थ देण्याचा प्रयत्न कारागृहातील वाचनालयातून सुरु आहे. बंदिवान दिवसभर काम करतात. खेळ, विविध सामाजिक उपक्रमात सहभागी होतात व वेळ मिळेल तेव्हा आवडत्या विषयाचे पुस्तक वाचन करतात. या वाचनातूनच जीवन विकासाची लढाई जिंकण्यासाठी बंदीजनांचा संघर्ष सुरु आहे.कायम बंदीवास, अंधार कोठडी, कठोर शासन अशी कारागृहाबाबत असलेली भितीदायक संकल्पना पूर्णपणे बदलली जात आहे. आज कारागृहांमध्ये कैद्याच्या शारीरिक व मानसिक विकासाकडे लक्ष दिले जात आहे. त्यातून त्यांच्यासाठी पुस्तक, मासिक, वर्तमानपत्रे, सांस्कृतिक कार्यक्रम व क्रीडा स्पर्धाचे आयोजन केले जात आहे. सुरक्षेची पूर्ण काळजी घेवून कैद्यांच्या आवडीनिवडी व मागणीनुसार विविध विषयांची पुस्तक पुरविण्यात येत असल्याचे जिल्हा कारागृहाचे पोलिस अधिक्षक आशिष गोसावी यांनी सांगीतले. *एक वर्षापासून नवीन पुस्तक नाहीकैद्याच्या मानसिक विकासाची भाषा बोलली जात असताना यात काही त्रुटीही निर्माण झाल्या आहेत. राज्यातील ४३ पैकी २७ कारागृहात गेल्या एक वर्षापासून नवीन पुस्तकांची भर पडली नाही. यामध्ये येरवाडा, मुंबई, अमरावती येथील मध्यवर्ती कारागृह, कल्याण, भायखळा, रत्नागिरी, धुळे, अकोला, भंडारा, चंद्रपूर, नाशिक, औरंगाबाद येथील वर्ग १ जिल्हा कारागृह, अलिबाग, सावंतवाडी, परभणी, उस्मानाबाद, बीड, जळगाव, विसापूर, सोलापूर, सांगली, अहमदनगर, येरवाडा कोल्हापूर, नाशिक रोड, नागपूर, अमरावती येथील खुले कारागृहांचा समावेश आहे.